इटगाव फाटा-साेनेगाव रस्त्याची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:08 AM2021-03-22T04:08:32+5:302021-03-22T04:08:32+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : तालुक्यातील पारशिवनी-खापरखेडा मार्गावर असलेल्या इटगाव फाटा ते साेनेगाव या रस्त्याची गेल्या कित्येक वर्षांपासून अतिशय ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : तालुक्यातील पारशिवनी-खापरखेडा मार्गावर असलेल्या इटगाव फाटा ते साेनेगाव या रस्त्याची गेल्या कित्येक वर्षांपासून अतिशय दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर जागाेजागी खड्डे पडले असून, यामुळे लहान-माेठे अपघात घडत आहेत, परंतु या रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्षच हाेत आहे.
इटगाव फाट्यापासून गुंढरी (वांढे) व पुढे सोनेगाव असा हा रस्ता आहे. गुंढरी (वांढे ) व सोनेगाव येथील नागरिकांना पारशिवनीला येण्यासाठी याच रस्त्याने ये-जा करावी लागते. काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या वतीने या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. सध्या या रस्त्याची गिट्टी ठिकठिकाणी उखडली असून, मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. दुसरीकडे गुंढरी, सोनेगाव येथील विद्यार्थी शिक्षणासाठी पारशिवनी येथे या मार्गाने ये-जा करतात. हा एकमेव मार्ग असल्याने या रस्त्याने अनेकदा अपघातही झाले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दुचाकी वाहन स्लिप हाेऊन अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडत आहेत. एकूणच उखडलेल्या रस्त्यामुळे नागरिकांना प्रवास करणे कठीण हाेत आहे. त्यामुळे या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी संतप्त नागरिक व विद्यार्थ्यांनी केली आहे.