कामठी-महालगाव मार्गाची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:11 AM2021-07-14T04:11:41+5:302021-07-14T04:11:41+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : कामठी-घाेरपड-महालगाव या मार्गाची अतिशय दुर्दशा झाली असून, रस्त्यात जागाेजागी खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : कामठी-घाेरपड-महालगाव या मार्गाची अतिशय दुर्दशा झाली असून, रस्त्यात जागाेजागी खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील खड्डे बुजवून रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांनी केली आहे.
कामठी, घाेरपड, लिहीगाव, महालगाव या मार्गाचे सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्षभरापूर्वी डांबरीकरण केले. मात्र, निकृष्ट कामामुळे अल्पवधीतच रस्त्यावरील डांबरीकरण उखडून जागाेजागी खड्डे पडले आहेत. खड्ड्यात पाणी साचून राहत असल्याने वाहनचालकांचा अंदाज चुकताे. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहने उसळून अपघात घडले आहेत. त्यात काहींना अपंगत्वसुद्धा आले आहे.
कामठी येथे तहसील कार्यालय, पंचायत समिती, उपजिल्हा रुग्णालय आणि शैक्षणिक संस्था असल्याने ग्रामीण भागातील महालगाव, दिघाेरी, कढाेली, परसाड, लिहीगाव, घाेरपड, शिरपूर, आदी गावांतील नागरिक तसेच शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विक्रीसाठी कामठीला यावे लागते. शिवाय हा मार्ग परिसरातील गावकऱ्यांसाठी महत्त्वाचा व साेयीचा आहे. मात्र, रस्त्याच्या दैन्यावस्थेमुळे ये-जा करणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागताे. या मार्गावरील खड्डे बुजविण्याबाबत गावकऱ्यांनी सार्वजनिक विभागाकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, त्याची कुणीही दखल घेतली नाही. त्यामुळे या मार्गावरील खड्डे बुजवून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी लिहीगावचे सरपंच गणेश झाेड, उपसरपंच सुनीता ठाकरे, रवींद्र निकाळजे, सुषमा ठाकरे, विशाखा बाेरकर, हरीश निकाळजे, सुनीता साेनटक्के, घाेरपड येथील तारा कडू, उपसरपंच अनिकेत वानखेडे, नीलेश ढाेणे, आशा कुरूळकर, प्रकाश खांडेकर, गीता पांडे, सुनीता कुर्वेकर, भारती मानमुंडरे, राजपल्लवी जयस्वाल, कुणाल कडू, शारदा माेरे, आदींसह नागरिकांनी केली आहे.