कन्हान-अराेली मार्गाची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:11 AM2021-08-13T04:11:27+5:302021-08-13T04:11:27+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : कन्हान-चाचेर-अराेली या मार्गावर जागाेजागी खड्डे पडले असून, रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली आहे. त्यामुळे या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : कन्हान-चाचेर-अराेली या मार्गावर जागाेजागी खड्डे पडले असून, रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली आहे. त्यामुळे या मार्गाने वाट काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. रस्त्यातील खड्ड्यांमुळे अपघातही वाढले असून, अनेकांना अपघातात अपंगत्व आले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने या मार्गाची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कन्हान ते अराेली या मार्गाचे दाेन वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले हाेते. परंतु निकृष्ट बांधकाम तसेच मार्गाने हाेणाऱ्या जड वाहतुकीमुळे डांबरीकरण उखडून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यातील खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत. या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार पडून अपघात हाेतात. यामुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे तर काहींना अपंगत्व आले आहे.
चाचेर, अराेली, किरणापूर, दुधाळा, चाेखाळा, काेदामेंढी परिसरातील शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी याच मार्गाने नागपूर येथे यावे लागते. साेबतच चाचेर परिसरात असलेल्या कंपनीतील जड वाहतुकीची वाहने या मार्गाने धावतात. तसेच नागरिकांना शासकीय कार्यालये, आराेग्य सेवा, शैक्षणिक आदी महत्त्वाच्या कामासाठी नागपूरला जाण्यासाठी हा मार्ग साेयीचा असल्याने या मार्गावर सतत वर्दळ असते. मात्र मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे बुजवून मार्गाची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.