काटाेल-खंडाळा रस्त्याची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:07 AM2021-06-25T04:07:37+5:302021-06-25T04:07:37+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : शहरापासून अवघ्या ३ किमी. अंतराच्या काटाेल-खंडाळा (खुर्द) डांबरी रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : शहरापासून अवघ्या ३ किमी. अंतराच्या काटाेल-खंडाळा (खुर्द) डांबरी रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर जागाेजागी खड्डे पडले असून, हा मार्ग वाहतुकीसाठी डाेकेदुखी ठरत आहे. त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
खंडाळा (खुर्द) येथील नागरिकांचा काटाेल येथे दैनंदिन संपर्क येताे. शिवाय हा मार्ग सतत वर्दळीचा आहे. सात वर्षांपूर्वी या रस्त्याची अत्यंत दैनावस्था झाली हाेती. त्यावेळी गावातील तरुणांनी एकत्रित येत संबंधित कार्यालयाला घेराव घालून रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी रेटून धरली. तरुणांच्या आंदाेलनाची दखल घेत डांबरीकरण मंजूर करीत दीड किमी. रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले हाेते. त्यानंतर तत्कालीन पं.स. सभापती संदीप सराेदे यांच्या पुढाकारातून उर्वरित दीड किमी. रस्त्याचे दाेन वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले.
सद्यस्थितीत ३ किमीचा हा रस्ता अर्धा नवीन तर अर्धा खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसह नागरिकांना कमालीचा त्रास साेसावा लागत आहे. याकडे स्थानिक लाेकप्रतिनिधींनी लक्ष पुरवून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा आंदाेलनाचा इशारा संदीप वंजारी, सुखदेव बेलखेडे, प्रवीण नासरे, राहुल ढाेबळे, प्रवीण बाेरकर, साहेबराव चरडे, प्रीतम जाेगेकर, संजय खुजनारे, अमित चरडे, खुशाल बेलखेडे, राेशन गवळी, शेखर चरडे आदींसह खंडाळा (खुर्द) येथील नागरिकांनी दिला आहे.