येणीकाेणी- अंबाडा रस्त्याची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:07 AM2021-06-21T04:07:21+5:302021-06-21T04:07:21+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क नरखेड : तालुक्यातील येणीकाेणी फाटा ते अंबाडा (देशमुख) या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर जागाेजागी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : तालुक्यातील येणीकाेणी फाटा ते अंबाडा (देशमुख) या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर जागाेजागी खड्डे पडले असून, डांबरीकरण पूर्णत: उखडले आहे. शिवाय या रस्त्यालगत माेठ्या प्रमाणावर झुडपे वाढली असल्याने अपघाताचा धाेका निर्माण झाला आहे. त्यामुळे या रस्त्याने ये-जा करताना पादचाऱ्यांसह वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते.
या रस्त्याच्या दैनावस्थेमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून, अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. असे असतानाही रस्त्यालगतची झुडपे कापली नाही. रस्त्यातील वळणावर दुचाकीस्वाराचे संतुलन बिघडल्याने अपघात घडतात. रात्रीच्या सुमारास प्रवाशांना हा रस्ता आहे की जंगलातील वाट, हे कळायला मार्ग नाही. तसेच या रस्त्यात जागाेजागी खड्डे पडले आहेत. मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्षच करीत आहे. यामुळे अंबाडावासी संताप व्यक्त करीत आहेत.
येणीकाेणी ते अंबाडा (देशमुख) या ५ किमी. रस्त्यातील खड्ड्यांमुळे अपघात नित्याची बाब झाली आहे. हा मार्ग शेमडा, चाेरखैरी, आग्रा, मन्नाथखेडी, गाेवारगाेंदी आदी गावांना जाेडणारा असून, नागरिकांना तालुकास्थळी ये-जा करण्यासाठी अत्यंत साेईचा मार्ग आहे. परंतु रस्त्याच्या दैनावस्थेमुळे नागरिकांना फेरा मारून सावरगावमार्गे नरखेड येथे जावे लागते. यात नागरिकांचा पैसा व वेळही वाया जाताे. पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना प्रवास करताना नाहक त्रास साेसावा लागताे. त्यामुळे बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष पुरवून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी तसेच रस्त्यालगतची झुडपे कापण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.