हत्येचा कट व तयारी आधीपासूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 01:17 AM2017-09-13T01:17:25+5:302017-09-13T01:17:25+5:30

बहुचर्चित कुश कटारिया हत्या प्रकरणातील सिद्धदोष आरोपी आयुष निर्मल पुगलिया (वय २७) याची निर्घृण हत्या करणारा आरोपी सूरज विशेषराव कोटनाके (वय २४) हा अत्यंत क्रूर आणि खुनशी स्वभावाचा आहे.

The plot of murder and preparations already existed | हत्येचा कट व तयारी आधीपासूनच

हत्येचा कट व तयारी आधीपासूनच

Next
ठळक मुद्देआयुष पुगलिया हत्याकांड : आरोपी कोटनाके वेगळ्या कोठडीत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहुचर्चित कुश कटारिया हत्या प्रकरणातील सिद्धदोष आरोपी आयुष निर्मल पुगलिया (वय २७) याची निर्घृण हत्या करणारा आरोपी सूरज विशेषराव कोटनाके (वय २४) हा अत्यंत क्रूर आणि खुनशी स्वभावाचा आहे. त्याने हत्येचा कट आणि तयारी आधीपासूनच करून ठेवल्याचा निष्कर्ष तपास यंत्रणांनी काढला आहे. दरम्यान, या हत्याकांडामुळे दडपणात आलेल्या कारागृह प्रशासनाने आता आतमधील सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक केली आहे. हत्या करणाºया सूरज कोटनाके याला वेगळ्या स्वतंत्र कोठडीत डांबले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून येथील मध्यवर्ती कारागृहात आजन्म कारावासाची शिक्षा भोगत असलेला आरोपी कोटनाके आणि कुश कटारियाचे अपहरण करून हत्या करणारा आयुष पुगलिया हे दोघे एकाच बराकीत (छोटी गोल) राहत होते. कारागृह सूत्रांनुसार हे दोघे आधी एकाच हंडीत जेवायचे. दोघेही तापट वृत्तीचे असल्यामुळे त्यांच्यात वाद झाला. तो वाढतच गेला आणि अखेर ११ सप्टेंबर, सोमवारी सकाळी ७ वाजता सूरज कोटनाकेने पुगलियाच्या डोक्यात फरशी घालून कटनीने त्याचा गळा कापला. त्यानंतर आरोपीने ही कटनी धुवून काढली. ती बाजुच्या झुडूपात लपवून ठेवली आणि स्वत:च पुगलियाका गेम बजाया, असे म्हणत कारागृह रक्षकांना माहिती दिली. त्यानंतर कारागृहात एकच खळबळ उडाली. कारागृह प्रशासनाने फोनवरून पोलिसांना कळविले.
पोलिसांनी पंचनामा करण्यासाठी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाºयांकडून पंचनामा करवून घेतला. त्यानंतर सायंकाळी मृतदेह मात्र, मेडिकलमध्ये रवाना केला.
मंगळवारी सकाळी मेडिकलमध्ये पुगलियाचे शवविच्छेदन झाले. त्यानंतर दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. इकडे कारागृहातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली. आता अशी घटना घडणार नाही, यासाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी कारागृह प्रशासनाला दिल्या. आम्ही या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करीत असून, अनेक कैद्यांनाही विचारपूस करण्यात आल्याचे देसाई यांनी लोकमतला सांगितले.
गृहसचिवांना पत्र
दरम्यान, आरोपी कोटनाकेला अटक करण्यासाठी शहर पोलिसांनी गृहविभागाच्या सचिवांना पत्र लिहून त्याच्या अटकेची परवानगी मागितलीआहे. ही परवानगी मिळाल्यानंतरच त्याला पोलीस अटक करू शकतील.

Web Title: The plot of murder and preparations already existed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.