बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंडाची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:10 AM2021-09-26T04:10:23+5:302021-09-26T04:10:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंडाची विक्री करून एका व्यक्तीचे ११ लाख रुपये हडपणाऱ्या आरोपी रमेश ...

Plot sale on the basis of forged documents | बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंडाची विक्री

बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंडाची विक्री

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंडाची विक्री करून एका व्यक्तीचे ११ लाख रुपये हडपणाऱ्या आरोपी रमेश बबनराव ठाकरे विरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

आरोपी रमेश ठाकरेने दोन वर्षांपूर्वी दोषांत दाैलतराव नितनवरे (वय ४०, रा. यशवंत नगर) यांना माैजा भामटीतील एक भूखंड दाखविला. त्याची बनावट कागदपत्रे दाखवून आरोपी ठाकरेने तो नितनवरे यांना २३ ऑगस्ट २०१९ ला विकला. त्यापोटी ११ लाख रुपये घेतले. दरम्यान, हा भूखंड ठाकरे याच्या मालकीचा नसून, बाबूराव चंपतराव कराडे यांनी तो १२ फेब्रुवारी २००२ ला जयश्री सहारे यांना विकला होता, हे उघड झाले. त्यामुळे नितनवरे यांनी एमआयडीसी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चाैकशी करून शुक्रवारी याबाबत आरोपी ठाकरेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

----

Web Title: Plot sale on the basis of forged documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.