निर्विघ्न गणेशोत्सवासाठी खड्डे बुजवा; मैदानात डस्टची व्यवस्था करा, सहायक आयुक्तांकडे मागणी
By गणेश हुड | Published: September 5, 2023 03:42 PM2023-09-05T15:42:14+5:302023-09-05T15:45:35+5:30
लक्ष्मीनगर झोनमधील सार्वजनिक गणेशात्सव मंडळांची मागणी
नागपूर : १९ सप्टेंबरला गणरायांचे निर्विघ्न आगमण व्हावे, भक्तांना गणेशोत्सव आनंदाने साजरा करता यावा, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवनगी तातडीने देण्यात यावी. महापालिका प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वी मिरवणुकीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवावे, मैदानात पाणी साचणार नाही. यासाठी डस्टची व्यवस्था करावी. रस्त्यावर आलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्यात याव्या अशी मागणी लक्ष्मीनगर झोनमधील सार्वजनिक गणेशात्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी माजी शिक्षण सभापती गोपाल बोहरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मंगळवारी सहायक आयुक्त मिलींद मेश्राम यांना दिलेल्या निवेदनातून केली.
मंडळ परिसरातील सार्वजनिक ठिकाणी वाढलेल्या गवताची कटींग करण्यात यावी. रस्त्यावरील व गणेश मंडळ परिसरातील पथदिवे सुरू राहतील अशी व्यवस्थ करा, मंडळांना तातडीने परवानगी मिळेल अशी व्यवस्था करा, विसर्जन कुंडाजवर विद्युत व्यवस्था करा, तात्या टोपे नगर ते प्रताप नगर सिमेंट रोड तसेच देवनगर या सिमेंट रस्त्यांचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करा, वाहतूक वळविल्याने दत्ता मेघे कॉलेज, एनआयटी कॉलनी, अत्रे ले-आऊट , गिट्टीखदान ले-आऊट, इनकम टॅक्स कॉलनी, एस.ई.रेल्वे कॉलनी. फेन्ड्स कॉलनी परिसरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. यासंदर्भात शिष्टमंळाने सहायक आयुक्तांशी चर्चा केली.
शिष्टमंडळात साहस गणेशोत्सव मंडळाचे गोपाल बोहरे, श्री सिद्धीविनायक फाऊंडेशनचे निलेश राऊत, तात्याटोपे नगर नागरिक मंडळाचे शौनक जहागिरदार, युवा संकल्प गणेशोत्सव मंडळाचे आशुतोष भगत, नवयवक गणेश उत्सव मंडळाचे आदित्य बनकर, युवक गणेश उत्सव मंडळाचे देवा डेहनकर, बाल गणेशोत्सव मंडळाचे सारंग कदम, श्री विघ्नहर्ता बाल गणेश उत्सव मंडळाचे प्रणय तरार आदींचा समावेश होता.