बचत गटाच्या महिलांशी पंतप्रधानांनी साधला संवाद ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:11 AM2021-08-13T04:11:42+5:302021-08-13T04:11:42+5:30
नागपूर : महिलांनी कोरोना काळात मास्क, सॅनिटायझर, फूड, पालेभाज्या यांची विक्री करून मोठे व्यवसाय उभारले. स्थलांतरितांना मदतीचा हात ...
नागपूर : महिलांनी कोरोना काळात मास्क, सॅनिटायझर, फूड, पालेभाज्या यांची विक्री करून मोठे व्यवसाय उभारले. स्थलांतरितांना मदतीचा हात दिला. संकटकाळात मोठ्या हिमतीने उभ्या राहिल्या तसेच बँकेचे व्यवहार पारदर्शक पद्धतीने हाताळले. देशभरातील अशा बचत गटातील महिलांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी संवाद साधला.
स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
नागपुरातील बचत गटातील महिलासुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयातील एन.आय.सी. या वेब रूमद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी गिरीश व्यास, जि.प.चे. मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा अभियान व्यवस्थापक अल्पना बोस, जिल्हा व्यवस्थापक, अमोल बाविस्कर, जिल्हा व्यवस्थापक सारंग कुंटे, जिल्हा व्यवस्थापक, सोनाली भोकरे, जिल्हा व्यवस्थापक भाग्यश्री भोयर उपस्थित होते. देशातील राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या स्वयंसहाय्यता समूहातील महिलांचा मोलाचा वाटा आहे. या माध्यमातून महिला मोठ्या प्रमाणात विकासाकडे वाटचाल करीत आहेत. या अभियानाच्या सहकार्याने महिलांमध्ये ज्या पद्धतीने आत्मविश्वास निर्माण झाला आहे, तो खऱ्या अर्थाने प्रेरणादायी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.