पंतप्रधान मोदी उद्या नागपूरमध्ये
By Admin | Published: April 13, 2017 07:53 PM2017-04-13T19:53:08+5:302017-04-13T19:53:08+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या नागपूरमध्ये येणार आहेत. भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने सकाळी 10.45 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं आगमन
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 13- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या नागपूरमध्ये येणार आहेत. भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने सकाळी 10.45 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं आगमन होईल. विमानतळावर स्वागताचा स्वीकार केल्यानंतर दीक्षाभूमीसाठी ते प्रयाण करतील.
दीक्षाभूमी येथे सकाळी 11.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्ष समारोहास ते उपस्थित राहतील. तसेच पवित्र दीक्षाभूमी स्तूपास भेट देऊन आदरांजली अर्पण करतील. त्यानंतर ते कोराडी थर्मल पॉवर स्टेशनकडे रवाना होतील. सकाळी 11.45 ते दुपारी 12.10 वाजेपर्यंत कोराडी थर्मल पॉवर स्टेशनचे उद्घाटन समारोहाप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. दुपारी 12.25 वाजता मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित शासनाच्या विविध प्रकल्पाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. यावेळी डिजीधन मेळावाचा समारोप होईल. याशिवाय ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी’ हे विशेष टपाल तिकीट पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशित करण्यात येईल. तसेच पंतप्रधान उपस्थित जनसमुदयाला मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर दुपारी 1.45 वाजता विभागीय क्रीडा संकुल येथून विमानतळाकडे प्रयाण करतील.