कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाला नॅकची ‘ए प्लस’ श्रेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 08:15 PM2022-01-04T20:15:44+5:302022-01-04T20:16:07+5:30

Nagpur News रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाला नॅकतर्फे ‘ए प्लस’ श्रेणी बहाल करण्यात आली आहे.

Poet Vice-Chancellor Kalidas Sanskrit University awarded NAC's 'A Plus' category | कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाला नॅकची ‘ए प्लस’ श्रेणी

कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाला नॅकची ‘ए प्लस’ श्रेणी

googlenewsNext

नागपूर : रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाला नॅकतर्फे ‘ए प्लस’ श्रेणी बहाल करण्यात आली आहे. विद्यापीठाला याअगोदर ‘बी प्लस’ श्रेणी होती व मागील पाच वर्षांच्या कामगिरीच्या आधारे ही श्रेणी प्रदान करण्यात आली आहे.

२७ ते २९ डिसेंबर या कालावधीत श्रीशंकराचार्य संस्कृत विद्यापीठ, कालडी, केरळचे माजी कुलगुरू प्रो. धर्मराजम पी. के. यांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यीय नॅक समितीने तीन दिवस रामटेक, वारंगा, नागपूर येथील विश्व विद्यालयाच्या शैक्षणिक, संशोधन, प्रशासकीय कार्याचे मूल्यांकन केले. आगामी काळात विश्व विद्यालय नवनवीन कर्तृत्वाचे शिखर गाठेल, अशी भावना कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांनी व्यक्त केली. विद्यार्थी, पालक, हितचिंतक, प्राध्यापक आणि इतर कर्मचारी यांच्या सहभागाने विद्यापीठाने दोन शाळा दत्तक घेऊन त्यांचे आनंदी शाळांमध्ये रूपांतर केले. याशिवाय विविध सामाजिक उपक्रमातदेखील विद्यापीठाने हातभार लावला.

Web Title: Poet Vice-Chancellor Kalidas Sanskrit University awarded NAC's 'A Plus' category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.