देशभरातून रंगले ‘कविसंमेलन फ्रॉम होम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 07:14 PM2020-04-13T19:14:31+5:302020-04-13T19:15:08+5:30

आपण सगळे ‘कोरोना काल’मध्ये वावरतो आहोत. इथून पुढचा इतिहास लिहिला जाईल तो ‘प्री कोरोना’ आणि ‘पोस्ट कोरोना’ असा. या काळाचा जगतावर झालेला परिणाम, हा त्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा भाग असणार आहे.

'Poetry Meeting from Home' staged from across the country | देशभरातून रंगले ‘कविसंमेलन फ्रॉम होम’

देशभरातून रंगले ‘कविसंमेलन फ्रॉम होम’

ठळक मुद्देऑनलाईन मैफिलीतून झाला संवेदनेचा ऊहापोह

 




लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपण सगळे ‘कोरोना काल’मध्ये वावरतो आहोत. इथून पुढचा इतिहास लिहिला जाईल तो ‘प्री कोरोना’ आणि ‘पोस्ट कोरोना’ असा. या काळाचा जगतावर झालेला परिणाम, हा त्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा भाग असणार आहे. या काळाच्या पार्श्वभूमीवरच एकमेकांना भेटणे अवघड झाले आहे आणि अशात मैफिली रंगने तर दूरचीच बाब. मात्र, दुरावा मिटविणारी माध्यमे या अशा एकांतवासाला आधारवड ठरत आहेत. याच आधारवडीचा लाभ घेत रद्द करावी लागलेली काव्यमैफिल ‘कविसंमेलन फ्रॉम होम’ अशी रंगली. यात देशभरातून कवि सहभागी झाले.

या कविसंमेलनात नागपूर, मुंबई, पुणे, अमरावती, अकोला, नाशिक, ग्वाल्हेर या भागातील डॉ. शरयु शहा, प्रा. सुनील जोशी, डॉ. उमा बोडस, डॉ. उज्वला चक्रदेव, निलेश कवडे, हरी धारकर, डॉ. मोना चिमोटे, भारती मोडक, प्रशांत त्रिभुवन, प्रशांत पनवेलकर, डॉ. शुचिता फडके, अनुपमा मुंजे, डॉ. विक्रांत तिकोणे, सना पंडित, मोहन पाटील हे कवी सहभागी झाले आणि संवेदनेचा ऊहापोह झाला. या ऑनलाईन मैफिलीच्या संचालनाची धूरा नागपूरच्या कवयत्री सना पंडित यांनी सांभाळली. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक विलगीकरण जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तेथे कविसंमेलनाचे आयोजन म्हणजे दिवास्वप्नच. पण, तंत्रज्ञानाची कांस धरत सृजनशीलतेला तंत्रज्ञानाची जोड देत व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून हे कविसंमेलन घडून आले. खरे सांगायचे तर साहित्यात रूची असलेल्या या मैत्रांच्या समूहानने कविसंमेलनाचे आयोजन करण्याचा निर्धार केला होता. त्याअनुषंगाने तयारी सुरू असतानाच लॉकडाऊनची घोषणा झाली आणि सगळे नियोजन फसले. तेव्हा पुण्यातल्या डॉ. रेखा देशमुख यांनी कल्पना मांडली ‘लाईव्ह ऑन लाईन कवी संमेलना’ची आणि लगेच उचलून धरली समूह संचालकद्वय प्रशांत पनवेलकर आणि डॉ. मोना चिमोटे यांनी. ‘वर्क फ्रॉम होम’च्या या कालावधीत ऑनलाईन मिटींग साठी वापरल्या जाणाऱ्या झुम या अ‍ॅपचा वापर करायचे ठरले आणि ही संपूर्ण प्रक्रीया मोहन पाटील यांनी पेलली.



 

 

Web Title: 'Poetry Meeting from Home' staged from across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.