आंबेडकरी जाणिवांचे मर्मस्पर्शी काव्यसंमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 01:31 AM2019-03-10T01:31:00+5:302019-03-10T01:31:53+5:30
संमेलनाच्या चौथ्या सत्रात ‘आंबेडकरी काव्य संध्या’ या आंबेडकरी जाणिवांच्या मर्मस्पर्शी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संमेलनाच्या चौथ्या सत्रात ‘आंबेडकरी काव्य संध्या’ या आंबेडकरी जाणिवांच्या मर्मस्पर्शी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.
कवयित्री संध्या रंगारी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कवी संमेलनात माया वासनिक, अहिल्या रंगारी, दीपाली दीप, सरिता सातरडे, सुषमा कळमकर, शीला घरडे-पाटील, शुभांगी जुमळे, सीमा भसारकर, विजयालक्ष्मी वानखेडे, संजय गोडघाटे, हृदय चक्रधर, शालिक जिल्हेकर, संजय मोखडे यांनी आपल्या आंबेडकरी जाणिवेच्या कविता सादर केल्या. यात झारखंडच्या कवयित्री निर्मला पुतुल यांनी त्यांच्याच ‘नगाडे की तरहा...’ या काव्यसंग्रहातील कविता मर्मस्पर्शी ठरली. याशिवाय कल्याणी ठाकूर यांनीही बांग्ला भाषेत कविता सादर केली. यानंतर रात्री झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात संजय जीवने यांचे लेखन असलेले ‘मी रमाई बोलते’ या एकपात्री नाट्याचा प्रयोग सादर झाला. अभिनय व दिग्दर्शन सांची जीवने यांचा होता. यानंतर संबुद्ध महिला संघातर्फे पल्लवी जीवनतारे यांचे लेखन दिग्दर्शन असलेल्या ‘संविधान’ या पथनाट्याचे सादरीकरणही करण्यात आले. हंसा नारनवरे यांनी आभार मानले.