दक्षिण एक्सप्रेसमध्ये विषारी सापाची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:14 AM2017-08-03T02:14:20+5:302017-08-03T02:14:48+5:30

दक्षिण एक्स्प्रेसमधून होणाºया विषारी सपाची तस्करी रेल्वे सुरक्षा दलाने पकडली. या सापाच्या विषाची किंमत बाजारात २० लाखावर असल्याचे सर्पमित्र, वन विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.

Poisonous snake smuggling in South Express | दक्षिण एक्सप्रेसमध्ये विषारी सापाची तस्करी

दक्षिण एक्सप्रेसमध्ये विषारी सापाची तस्करी

Next
ठळक मुद्दे‘आरपीएफ’चा दणका : तस्कर पकडला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण एक्स्प्रेसमधून होणाºया विषारी सपाची तस्करी रेल्वे सुरक्षा दलाने पकडली. या सापाच्या विषाची किंमत बाजारात २० लाखावर असल्याचे सर्पमित्र, वन विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.
रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेचे निरीक्षक भगवान इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेगाड्यात अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी उपनिरीक्षक अरुण ठवरे, सहायक उपनिरीक्षक संजय पुरकाम, दीपक वानखेडे, विजय पाटील, किशोर चौधरी, नीळकंठ गोरे यांची चमू स्थापन करण्यात आली आहे. ही चमू बुधवारी सायंकाळी ६ वाजता कळमेश्वर ते नागपूर दरम्यान रेल्वेगाडी क्रमांक १२७२२ दक्षिण एक्स्प्रेसमध्ये गस्त घालत होते.
त्यांना एका पेटाºयात एक संशयास्पद वस्तू दिसली. या पेटाºयाबाबत विचारणा केली असता आरोपी सामन हुशयार गोसावी (२४) रा. शंकरगड, अलाहाबाद याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याजवळील पेटारा उघडून पाहिला असता त्यात दोन तोंडाचा साप (मांढळ) असल्याचे निदर्शनास आले. लगेच त्यास पकडून आरपीएफच्या गुन्हे शाखेत आणण्यात आले.
आरपीएफने याबाबत शहरातील सर्पमित्र तसेच वन विभागाला सूचना दिली. पकडण्यात आलेल्या सापाचे विष बाजारात २० लाखाच्यावर विकल्या जाते. पकडण्यात आलेला साप सध्या दोन फुटांचा असून तो साडेपाच फुटांचा झाल्यानंतर त्याच्या शरीरात तयार होणारे विष अतिशय महागडे असल्याने त्याची तस्करी होत असल्याची माहिती सर्पमित्र अभिषेक देवगीरकर आणि वन विभागाच्या अधिकाºयांनी दिली.

Web Title: Poisonous snake smuggling in South Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.