पोळा : पारंपरिक पूजन पण सार्वजनिक उत्सवावर विरजण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 08:57 PM2020-08-18T20:57:43+5:302020-08-18T21:04:32+5:30

वर्षभर बळीराजासोबत शेतात कष्ट उपसणाऱ्या जिवाभावाचा सोबती बैलांच्या कृतज्ञतापूर्वक पूजनाचा सण म्हणजे पोळा. मात्र दरवर्षीचा उत्साह यावेळी नाही. कोरोना महामारीने जसे यावेळी प्रत्येक सणाच्या उत्सवावर विरजण घातले, तसे पोळा सणावरही आहे.

Pola: A traditional pujan but not public festival | पोळा : पारंपरिक पूजन पण सार्वजनिक उत्सवावर विरजण

पोळा : पारंपरिक पूजन पण सार्वजनिक उत्सवावर विरजण

googlenewsNext
ठळक मुद्देबैलजोडीची घरीच पूजा, गोडधोड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्षभर बळीराजासोबत शेतात कष्ट उपसणाऱ्या जिवाभावाचा सोबती बैलांच्या कृतज्ञतापूर्वक पूजनाचा सण म्हणजे पोळा. मात्र दरवर्षीचा उत्साह यावेळी नाही. कोरोना महामारीने जसे यावेळी प्रत्येक सणाच्या उत्सवावर विरजण घातले, तसे पोळा सणावरही आहे. शहरांपेक्षा गावात या सणाला विशेष महत्त्व आहे. मात्र शारीरिक अंतराच्या नियमामुळे सार्वजनिक उत्साह साजरा करता आला नाही. असे असले पारंपरिक उत्सव थांबला नाही. लोकांनी परंपरेनुसार सर्जा-राजाचे पूजन केले.
दरवर्षी पोळ्याच्या आदल्या दिवशी हळद आणि कच्च्या तुपाने वेदनेवर फुंकर घालत खांदेशेकणी केली जाते व दुसऱ्या दिवशी घरी येण्याचे आमंत्रण दिले जाते. त्याला सजवून पोळ्याच्या दिवशी सर्व शेतकरी बैलांना घेऊन सार्वजनिक स्थळी जमा होतात. झाडत्या म्हणून आरोळ्या दिल्या जातात आणि गावाच्या मानवाईक व्यक्तीकडून झेंडी तोडून 'पोळा फुटला' असे जाहीर होताच शेतकरी घरोघरी जाऊन पुरणपोळी व पंचपक्वान्नाचे आराध्य अर्पिले जाते. यावर्षी हे सर्व सार्वजनिक सोपस्कार करणे शक्य होऊ शकले नाही. मात्र बळीराजाने त्याच्या सोबत्याला पारंपरिक मानसन्मान नक्की दिला.
सकाळी त्याची आंघोळ करून त्याला झूल, चौरंग मटाटे यांनी सजविण्यात आले आणि घरीच गृहिणीच्या हस्ते त्यांचे पूजन करण्यात आले. त्यांना पुरणपोळीचे आराध्य अर्पण करण्यात आले. कोरोनाच्या संकटात सार्वजनिक पोळा भरला नसला तरी बैलांप्रति कृतज्ञता व संवेदना व्यक्त करण्याची परंपरा पाळण्यात आली. ग्रामीण भागात हे चित्र दिसले.

गोडधोड आणि उत्साह
ग्रामीण भागासह शहरातही बहुतेकांच्या घरी महिलांनी पुरणपोळी, अनारसे, करंज्या अशा गोडधोड पक्वान्नांनी पोळ्याचा उत्सव साजरा केला. चौकात मातीच्या बैलाची प्रतिकृती आणून घरी पूजन करण्यात आले.

द्वारावर पळसाच्या फांद्या
पोळ्याच्या दुसऱ्या म्हणजे तान्हा पोळ्याच्या दिवशी पहाटे वैशिष्टय असलेली मारबत गावाच्या वेशीवर शिरवली जाते आणि रोगराई, अनिष्ट नष्ट करण्याचे आवाहन केले जाते. या परंपरेनुसार घरोघरी पळसाच्या फांद्या (मेढे) द्वारावर ठेवण्यात आल्या.

पारडी, काछीपुऱ्यात नाही भरला पोळा
दरवर्षी शहरात पारडी येथे उत्साहात पोळा साजरा करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. ४०-५० बैलजोड्या येथे गोळा होतात. काछीपुºयातही बैलजोड्या आणून पोळा भरविला जातो. मात्र यावेळी कोरोनाच्या प्रकोपामुळे पोळा साजरा न करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले. त्यामुळे दोन्ही भागातील आयोजकांनी पोळा भरविण्यापासून माघार घेतली. त्यामुळे उत्साहावर विरजण पडले आहे.

गावाची वारी थांबली
पोळा आला की गावाकडून शहरात आलेले लोक आपल्या गावाचा रस्ता धरतात. पोळा साजरा करताना तेथे मित्र, नातेवाईक आणि गावातील जुन्या माणसांशी भेटगाठ होते. मात्र यावेळी कोरोनाने सर्वांच्या उत्साहावर पाणी फेरले. गावची वाट बंद झाली.

Web Title: Pola: A traditional pujan but not public festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.