गंगा जमुनात पोलिसांची कारवाई : १४ युवतींची केली सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 08:01 PM2020-10-22T20:01:20+5:302020-10-22T21:24:43+5:30
Sex Racket, Police action in Ganga Jamuna , crime news , Nagpurगुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा शाखेने लकडगंजच्या गंगा जमुना वस्तीत धाड टाकून १४ महिलांची सुटका केली. गंगा जमुना देह व्यापारासाठी चर्चेत आहे. येथे देहव्यापारासाठी इतर राज्यातून महिला आणि युवतींना आणण्यात येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा शाखेने लकडगंजच्या गंगा जमुना वस्तीत धाड टाकून १४ महिलांची सुटका केली. गंगा जमुना देह व्यापारासाठी चर्चेत आहे. येथे देहव्यापारासाठी इतर राज्यातून महिला आणि युवतींना आणण्यात येते. अड्ड्याचा सूत्रधार त्यांच्याकडून देह व्यापार करवून घेतो. सामाजिक सुरक्षा शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गंगा जमुनात धाड टाकण्यात आली. तेथे बाबू निजू धनावत (५०) रा. धौलपूर, राजस्थान, विमला आणि सचिन उचिया देहव्यापार करवून घेताना आढळले. त्यांच्या अड्ड्याची तपासणी केली असता १४ युवती आढळल्या. सर्व युवती दुसऱ्या राज्यातील आहेत. त्यांच्याकडून अनेक दिवसांपासून देहव्यापार करवून घेण्यात येत होता. पोलिसांनी बाबूला अटक करून युवतींना महिला सुधारगृहात पाठविले. बाबू आणि त्याच्या दोन्ही साथीदारांविरुद्ध अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायदा (पिटा) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.