विदर्भातील सर्वात मोठा रेडलाईट एरिया 'गंगाजमुना'त पोलिस कारवाई; एकीकडे असंतोष तर दुसरीकडे समाधान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 10:48 AM2021-08-13T10:48:47+5:302021-08-13T10:52:50+5:30

Nagpur News अनेक दशकांचा इतिहास असलेली आणि विदर्भातील सर्वांत मोठी वेश्यांची गंगा-जमुना ही वस्ती पोलिसांनी गुरुवारी सील केली.

Police action in Gangajmuna, the largest red light area in Vidarbha; Dissatisfaction on the one hand and satisfaction on the other | विदर्भातील सर्वात मोठा रेडलाईट एरिया 'गंगाजमुना'त पोलिस कारवाई; एकीकडे असंतोष तर दुसरीकडे समाधान 

विदर्भातील सर्वात मोठा रेडलाईट एरिया 'गंगाजमुना'त पोलिस कारवाई; एकीकडे असंतोष तर दुसरीकडे समाधान 

googlenewsNext
ठळक मुद्दे गुरुवारी सकाळपासून वस्ती सील करून मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. मार्ग बंद करण्यासोबतच पोलिसांनी उद्घोषकाचा वापर करून या भागात बाहेरून येणाऱ्यांवर कलम १४४ नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अनेक दशकांचा इतिहास असलेली आणि विदर्भातील सर्वांत मोठी वेश्यांची गंगा-जमुना ही वस्ती पोलिसांनी गुरुवारी सील केली. येथे यापुढे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांवर तसेच ग्राहक म्हणून वस्तीत फिरकणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे एकीकडे काहींना आनंद झाला असतानाच दुसरीकडे तीव्र असंतोषही निर्माण झाला आहे.

अनेक वर्षांपासून गंगा-जमुना वस्तीत वेश्याव्यवसाय सुरू आहे. पाच वर्षांपूर्वीपर्यंत येथे महाराष्ट्रातील विविध शहरांसह, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि इतरही अनेक प्रांतांतील सुमारे तीन ते चार हजार वारांगना देहविक्रय करत होत्या. पोलिसांनी कडक धोरण राबविले अन् नंतर कोरोनाने या वस्तीचे होत्याचे नव्हते केले. अनेक वारांगना आपापल्या गावांकडे निघून गेल्या. ज्यांचे कुणीच नाही, अशा पाचशे ते सातशे वारांगना तेथेच देहविक्रय करतात.

विरोध अन् समर्थन

परिसरातील मंडळींनी या कारवाईला समर्थन दिले. मात्र काही सामाजिक संघटना आणि नेत्यांनी जोरदार विरोधही केला. शरीर विकून पोट भरणाऱ्या महिलांवर कारवाईचा बडगा उगारण्याऐवजी पोलिसांनी शहरातील गुन्हेगारीला नियंत्रित करावे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्वाला धोटे म्हणाल्या. आम्रपाली संघटनेसह विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही जोरदार विरोध केला.

शेकडो कोटींची जमीन, कारवाईमागे कोण ?

गंगाजमुना बंद पाडण्याच्या कारवाईमागे कोण आहेत? असा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून वेळोवेळी उपस्थित केला जातो. शहरातील काही बिल्डरांची नजर या जमिनीवर असून, ते पडद्यामागे राहून ही शेकडो कोटींची जमीन बळकावण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्नशील असल्याचाही आरोप होतो. आज पुन्हा तशीच चर्चा शहरात केली जात होती.

---

Web Title: Police action in Gangajmuna, the largest red light area in Vidarbha; Dissatisfaction on the one hand and satisfaction on the other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.