दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क : पोलीस आयुक्तांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:32 PM2020-02-26T23:32:47+5:302020-02-26T23:34:44+5:30
दिल्लीत सीएएच्या विरोधानंतर पसरलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस सतर्क झाले आहेत. शहरात कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी ठाणेदारांना सतर्क आणि कडक राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी बुधवारी ठाणेदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिल्लीत सीएएच्या विरोधानंतर पसरलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस सतर्क झाले आहेत. शहरात कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी ठाणेदारांना सतर्क आणि कडक राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी बुधवारी ठाणेदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले आहेत.
सीएएच्या विरोधात दिल्लीत हिंसाचार पसरला आहे. यात पोलीस कर्मचाऱ्यांसह २५ जणांचा मृत्यू झाला तर शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. गुप्तचर विभागाने या प्रकारच्या घटना देशाच्या प्रमुख शहरात होण्याची शक्यता वर्तविली आहे. नागपूर देशाच्या केंद्रस्थानी असल्यासोबतच ते सत्ताकेंद्रही मानले जाते. याकडे पाहून शहर पोलीस सतर्क झाले आहेत. पोलीस आयुक्तांनी ठाणेदार आणि अधिकाऱ्यांना सुरक्षेसाठी पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांशी संपर्क साधून संवेदनशील परिसराची गस्त घालण्यास सांगण्यात आले आहे. संशयित आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर नजर ठेवून त्यांची धरपकड करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. पोलीस आयुक्तांनी ठाणेदारांना गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सांगितले आहे. सामाजिक नेत्यांशी चर्चा करून शांती राखण्यासाठी मदत घेण्याचा सल्ला दिला आहे. ठाणेदारांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. होळी जवळ असल्यामुळे शहर पोलीस सावधानता बाळगत आहेत. या बैठकीत सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, अप्पर आयुक्त नीलेश भरणएसह वरिष्ठ अधिकारी आणि ठाणेदार उपस्थित होते. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी उपराजधानीतील नागरिक शांत असून त्यांनी वेळोवेळी हे दाखवून दिल्याचे मत ‘लोकमत’ शी चर्चा करताना व्यक्त केले.