पोलीस व व्यापारी मित्र मंडळ स्थापन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:10 AM2018-08-22T00:10:07+5:302018-08-22T00:11:04+5:30
विदर्भातील व्यावसायिकांची आघाडी संस्था नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्या प्रतिनिधी मंडळाने अध्यक्ष हेमंत गांधी यांच्या नेतृत्वात नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेऊन चेंबरच्या उपक्रमाची माहिती दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील व्यावसायिकांची आघाडी संस्था नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्या प्रतिनिधी मंडळाने अध्यक्ष हेमंत गांधी यांच्या नेतृत्वात नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेऊन चेंबरच्या उपक्रमाची माहिती दिली.
गांधी यांनी उपाध्याय यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि चेंबरला भेट देण्याचे आमंत्रण दिले. गुन्हेगारांवर नियंत्रण येईल आणि व्यापारी, महिला व सामान्यांमध्ये सुरक्षेचे वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
चेंबरचे माजी अध्यक्ष व स्थानिक समस्या समितीचे संयोजक दीपेन अग्रवाल यांनी सांगितले की, पूर्वी पोलीस-व्यापारी मित्र मंडळ स्थापन करण्यात येत होते. त्यामुळे पोलिसांना व्यावसायिक क्षेत्रात कायदा-सुरक्षा कायम ठेवण्यास मदत व्हायची. हे मंडळ पुन्हा स्थापन करावे आणि गुन्हेगारांवर अंकुश आणण्याची आयुक्तांना विनंती केली.
उपाध्याय यांनी पोलीस-व्यापारी मित्र स्थापन करण्याचे आश्वासन दिले. चेंबरचे आमंत्रण स्वीकार करून लवकरच भेट देण्यास स्वीकृती दिली.
या प्रसंगी चेंबरचे उपाध्यक्ष अर्जुनदास आहुजा, अश्विन मेहाडिया, सचिव संजय के. अग्रवाल, कोषाध्यक्ष सचिन पुनियानी, सहसचिव रामअवतार तोतला, कार्यकारिणी सदस्य अशोक सिंघवी व नटवरलाल पटेल उपस्थित होते.