आरोपींना पोलिसांचे अभय ?

By admin | Published: November 3, 2015 03:25 AM2015-11-03T03:25:47+5:302015-11-03T03:25:47+5:30

सदनिका मालकाला सहा लाखांचा गंडा घालण्याच्या प्रयत्नात त्याची आणि प्रशासनाचीही दिशाभूल करणाऱ्या आरोपींना अटक

Police are absent of the accused? | आरोपींना पोलिसांचे अभय ?

आरोपींना पोलिसांचे अभय ?

Next

नागपूर : सदनिका मालकाला सहा लाखांचा गंडा घालण्याच्या प्रयत्नात त्याची आणि प्रशासनाचीही दिशाभूल करणाऱ्या आरोपींना अटक करण्यासाठी जरीपटका पोलीस टाळाटाळ करीत आहेत. विशेष म्हणजे, या प्रकरणात न्यायालयाने आदेश दिल्यामुळे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, दोन आठवडे होऊनही पोलिसांनी आरोपीला अटक केलेली नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
संदीप रघुनाथ ठवरे (वय ४२) हे जरीपटक्यातील मिसाळ लेआऊटमध्ये राहातात. आशय अपार्टमेंटमधील ठवरे यांची सदनिका आरोपी अमोल आणि त्यांचे वडील टिकेश्वर गौतमराव गोटेकर यांनी खरेदी केली. १२ लाखात सौदा झाल्यानंतर सहा लाख धनादेशाद्वारे देण्यात आले. उर्वरित सहा लाख मात्र नमूद कालावधी होऊनही गोटेकर यांनी ठवरेंना दिले नाहीत. त्यामुळे हे करारपत्र रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यावर गोटेकर यांनी रक्कम दिल्याचे भासवण्यासाठी बनावट पावती तयार केली. त्यावर ठवरेंची सही केली. ही बनावट कागदपत्रे ग्राहक न्यायालयात सादर करण्यात आली. आपली रक्कम हडपण्यासाठी गोटेकर यांनी बनावट कागदपत्रे तयार करून धोकेबाजी केल्याचे लक्षात आल्यामुळे ठवरेंनी जरीपटका पोलीस आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ठवरेंनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे त्यांची फसवणूक झाल्याचा निष्कर्ष काढत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यामुळे जरीपटका पोलिसांनी कोर्टाच्या आदेशावरून संदीप ठवरेंची तक्रार नोंदवून घेतली. फसवणुकीच्या ४२० कलमासह आरोपी अमोल आणि त्यांचे वडील टिकेश्वर गोटेकर यांच्यााविरुद्ध १५ आॅक्टोबरला गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नाही. (प्रतिनिधी)
टाळाटाळ कशासाठी?
४आधी गुन्हा दाखल करण्यासाठी आणि आता आरोपींना अटक करण्यासाठी जरीपटका पोलीस टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पोलीस ही टाळाटाळ कशासाठी करीत आहेत, ते कळायला मार्ग नाही. यासंदर्भात जरीपटका पोलिसांकडे विचारणा केली असता चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Police are absent of the accused?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.