नागपुरात पोलिसांचा जुगार अड्डा पकडला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 11:41 PM2018-06-16T23:41:26+5:302018-06-16T23:42:49+5:30

निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याकडून चालविला जात असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलीस उपायुक्तांनी शनिवारी सायंकाळी छापा घालून ९ आजी-माजी पोलिसांसह १२ जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि वाहनेही जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

Police arrest gambling of police in Nagpur! | नागपुरात पोलिसांचा जुगार अड्डा पकडला !

नागपुरात पोलिसांचा जुगार अड्डा पकडला !

Next
ठळक मुद्देडीसीपींचा दणका, १२ जणांना अटक९ आजी-माजी पोलीस सापडलेउपराजधानीत खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याकडून चालविला जात असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलीस उपायुक्तांनी शनिवारी सायंकाळी छापा घालून ९ आजी-माजी पोलिसांसह १२ जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि वाहनेही जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या बाजूच्या भागात रिकामी जागा आहे. तेथे झाडंझुडपं वाढल्याने जंगलासारखा परिसर निर्माण झाला आहे. येथे गेल्या अनेक दिवसांपासून रोज जुगार भरतो. दिवसभरात ताशपत्त्यावर लाखोंची हारजित होते. त्याची कुणकुण लागताच शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास खुद्द पोलीस उपायुक्त राकेश ओला यांनी सदरचे ठाणेदार सुनील बोंडे आणि त्यांच्या सहकाºयांसह तेथे छापा घातला. यावेळी सुखदेव मारोतराव गिरडकर (वय ४४, रा. गोरेवाडा), राहुल जीवन गिरी (वय २७, रा. महाल), भगवान सुखदेव वाकोडे (वय ५२, रा. झिंगाबाई टाकळी), नीळकंठ अजाबराव काळबांडे (वय ५१, रा. श्रीकृष्णनगर, गोधनी), कृष्णानंद रामनगिना पांडे (वय ५५, रा. गणेशपेठ), नर्बदाप्रसाद बनवारीलाल तिवारी (वय ५१), त्रिंबक मारोतराव वेळेतकर (वय ७४, रा. आर्यनगर), मुरलीधर शंकरराव सांभारे (वय ६२, रा. गोधनी), श्यामसुंदर इंद्रभान मिश्रा (वय ६१,र ा. झिंगाबाई टाकळी), नरेश शंकर सोनवाणे (वय ३८, रा. मकरधोकडा, आदिवासी आश्रमशाळा), नरेश अशोक मेश्राम (वय ३८, रा. पलांदूरकर लेआऊट वाडी, वन विभाग) आणि गोल्डी पुरुषोत्तम पाईक (वय ३८, भानखेडा, पोस्ट आॅफीस कर्मचारी) हे ताशपत्त्यावर रोख रकमेचा जुगार खेळताना आढळले. त्यांच्याकडून २२,०३० रुपये तसेच दुचाकी आणि ताशपत्त्यांसह २ लाख ६२ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्यांना ताब्यात घेऊन सदर ठाण्यात नेण्यात आले. त्यांना जुगार कायद्यानुसार अटक करण्यात आली.
मिश्रा चालवतो जुगार
गिरडकर, गिरी, वाकोडे आणि काळबांडे हे चार पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. पांडे शांतिनगर ठाण्यात आहे. तिवारी पोलीस मोटर परिवहन विभागात तर वेळेतकर, सांभारे आणि मिश्रा निवृत्त पोलीस कर्मचारी आहेत. श्यामसुंदर मिश्रा हाच या जुगार अड्ड्याचा संचालक असल्याचे समजते. तोच येथे अनेक दिवसांपासून जुगार भरवून कट्टा (कर) काढतो.
स्टेनगन घेऊन बसले जुगारात
या जुगार अड्ड्यावर सापडलेल्या पोलिसांपैकी दोघांकडे स्टेनगन होती, असे समजते. दरम्यान, या कारवाईमुळे शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. मध्यरात्रीपर्यंत यासंबंधाने सदर पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी होती. पोलीस उपायुक्त राकेश ओला तसेच सदरचे ठाणेदार सुनील बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मयूर चौरसिया, हवालदार भास्कर रोकडे, विनोद तिवारी, नायक प्रफुल्ल मानकर, गणेश जोगेकर, अतुल शिरभाते, राहुल बारापात्रे, संदीप पांडे, पंकज हेडाऊ, विशाल रोकडे,चंद्रशेखर फलके आणि कॉन्स्टेबल अशोक यांनी ही कामगिरी बजावली.

Web Title: Police arrest gambling of police in Nagpur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.