हत्तीमार चाकु घेऊन फिरला, पोलिसांनी तुरुंगात टाकला
By दयानंद पाईकराव | Published: April 14, 2024 02:50 PM2024-04-14T14:50:06+5:302024-04-14T14:50:41+5:30
लकडगंज पोलिसांचे पथक गुन्हेगारांच्या शोधात गस्त घालत होते.
दयानंद पाईकराव, नागपूर : कंबरेत हत्तीमार चाकु खोचून फिरणाºया आरोपीला लकडगंज पोलिसांच्या पथकाने गजाआड केले आहे. अभिजीत मोहनलाल यादव (२६, रा. ढोरे ले आऊट, श्रीनगर मानकापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शनिवारी १३ एप्रिलला लकडगंज पोलिसांचे पथक गुन्हेगारांच्या शोधात गस्त घालत होते.
तेवढ्यात त्यांना एक व्यक्ती गंगाजमुना येथे काळ््या रंगाचे टी शर्ट व जीन्स घालून शस्त्रासह फिरत असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस तेथे पोहोचले असता आरोपी अभिजीत पोलिसांना पाहून पळून जात होता. पोलिसांनी पाठलाग करून त्यास पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेत २०० रुपये किमतीचा हत्तीमार चाकू खोचलेला आढळला. सहपोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे आरोपीविरुद्ध कलम ४/२५, सहकलम १३५ नुसार गुन्हा दाखल करून त्याला गजाआड करण्यात आले. पुढील तपास लकडगंज पोलिस करीत आहेत.