नागपुरातील मोतीबाग परिसरात गुंडांकडून पोलिसांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 01:03 AM2018-08-03T01:03:41+5:302018-08-03T01:04:41+5:30
मोतीबाग परिसरात अवैध धंद्यावर छापामार कारवाई क रण्यासाठी पोहचलेल्या पोलिसांवर गुंडांनी हल्ला केला. हल्ला इतका भीषण होता की, पोलिसांना त्यातून आपला जीव वाचवत पळावे लागले. ही घटना ३१ जुलैच्या रात्री घडली. पोलिसांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडूनच ही घटना दाबून ठेवण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोतीबाग परिसरात अवैध धंद्यावर छापामार कारवाई क रण्यासाठी पोहचलेल्या पोलिसांवर गुंडांनी हल्ला केला. हल्ला इतका भीषण होता की, पोलिसांना त्यातून आपला जीव वाचवत पळावे लागले. ही घटना ३१ जुलैच्या रात्री घडली. पोलिसांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडूनच ही घटना दाबून ठेवण्यात आली.
सूत्रानुसार पहेलवान बाबा दरगाँह जवळ कालू नावाच्या गुंडाचा दबदबा आहे. तो फायरींगसह अनेक कारवाईमध्ये लिप्त आहे. काही दिवसांपूर्वी तो कारागृहातून जमानत मिळवून बाहेर आला आहे. कालूचा मोतीबाग परिसरात दारू, जुगार व मटका व मादक पदार्थाच्या विक्रीचा अड्डा आहे. त्याच्या साथीदाराने परिसरात असलेल्या रेल्वे क्वॉर्टरवर कब्जा केला आहे. ३१ जुलै रोजी रात्री पोलीस पथकाने कालूच्या अड्ड्यावर छापा टाकला. पोलिसांना बघून कालू व त्याचे साथीदार संतप्त झाले. त्यांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली. त्यामुळे पोलीस मागे हटले. दगडफेकीत जखमी होऊ नये म्हणून तेथून पाय काढला. जवळच एका चहाच्या टपरीजवळ एकत्र झाले. पोलीस चहाच्या टपरीवर उभे असल्याची माहिती पडताच गुंड तिथे पोहचले. त्यांनी टपरीवर जोरदार दगडफेक केली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच पाचपावली पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी टपरी चालकाला घटनेची तक्रार देण्यास सांगितले. पण टपरी चालकाने तक्रार करण्यास नकार दिला. त्यामुळे पोलीस रिकाम्या हाताने परत गेले.
पाच महिन्यापूर्वी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यावरसुद्धा इप्पा गँगने हल्ला केला होता. इप्पा गॅँगला पकडण्यासाठी गेलेले एपीआय ज्ञानेश्वर भदोडकर व त्यांच्या पथकावर हल्ला केला. त्यात पोलिसांचे वाहन क्षतिग्रस्त झाले होते. त्यानंतर पोलिसांनी इप्पा गँगच्या १३ गुंडावर मकोकाची कारवाई केली होती. यातील पाच आरोपी पोलिसांच्या हाती लागले. या प्रकरणात आरोपींचे नाव कमी केल्यामुळे पोलिसांची फजिती झाली होती. लोकमतने सर्वात पहिले हे प्रकरण पुढे आणले होते. बुधवारी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुंडांना संरक्षण देणार नाही, यापुढे त्यांची खैर नाही, असा दावा केला आहे. डॉ. उपाध्याय यांच्या शैलीशी नागपूरकर चांगलेच परिचित आहे. त्यामुळे आता गुंडाची खैर नाही, असा विश्वास नागरिकांना आहे.