नागपुरात चोराचा पाठलाग करणारा पोलीस विहिरीत पडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 10:30 PM2018-11-28T22:30:57+5:302018-11-28T22:33:47+5:30

चोराला पकडण्यासाठी गेलेला एक पोलीस कर्मचारी विहिरीत पडला. पोहणे येत असल्याने आणि साथीदारांच्या मदतीने त्याचा जीव थोडक्यात वाचला. ही घटना जरीपटका पोलीस ठाणे परिसरातील सीएमपीडी मार्गावर मंगळवारी घडली. योगेश चाफेकर असे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

Police chasing theft fell in the well in Nagpur | नागपुरात चोराचा पाठलाग करणारा पोलीस विहिरीत पडला

नागपुरात चोराचा पाठलाग करणारा पोलीस विहिरीत पडला

Next
ठळक मुद्देथोडक्यात वाचला जीव : जरीपटक्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चोराला पकडण्यासाठी गेलेला एक पोलीस कर्मचारी विहिरीत पडला. पोहणे येत असल्याने आणि साथीदारांच्या मदतीने त्याचा जीव थोडक्यात वाचला. ही घटना जरीपटका पोलीस ठाणे परिसरातील सीएमपीडी मार्गावर मंगळवारी घडली. योगेश चाफेकर असे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
ओम देवानी यांनी काही दिवसांपूर्वीच प्रकाश कांबळे यांच्याशी घराचा सौदा केला. प्रकाश सामान शिफ्ट करीत होते. घर बंद असल्याने मंगळवारी रात्री १२.३० वाजता चोरांनी आत प्रवेश केला. वस्तीतील लोकांनी पोलिसांना सूचना दिली. योगेश चाफेकर आपल्या साथीदारासह घटनास्थळी पोहोचले. पोलीस दारातून आत आले. योगेशला उजव्या बाजूला हालचाल दिसून आली. योगेश त्यादिशेने गेला. तिथे विहीर होती. विहिरीवर सिमेंटची शीट ठेवली होती. अंधारामुळे योगेशला काही दिसले नाही. सिमेंटच्या शीटवर पाय ठेवताच ते विहिरीत कोसळले. विहीर १५ फुटापेक्षा अधिक खोल होती. आवाज ऐकून योगेशचे साथीदार आणि परिसरातील लोक मदतीसाठी धावले. योगेशला पोहणे येत होते. त्यामुळे ते पाण्यात बुडाले नाही. साथीदारांनी आत दोरी टाकून योगेशला बाहेर काढले नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. विहिरीच्या चारही बाजूंनी सळाकी लागलेल्या होत्या. योगेश मध्यभागी पडल्याने मोठा अनर्थ टळला. यात चोरांना पळून जाण्याची संधी मिळाली.

सफाई करीत असलेल्या युवकाचा मृत्यू
त्याचप्रकारे विहिरीची सफाई करीत असलेल्या एका युवकाचा दोरीवरून घसरून मृत्यू झाला. सुधीर अनिल घोडके (१८) रा. राणी भोसलेनगर सक्करदरा, असे मृताचे नाव आहे. सुधीर २६ नोव्हेंबर रोजी दुपारी आदर्शनगर येथे सफाई करीत होता. यादरम्यान दोरीच्या मदतीने वर येताना त्याचा हात घसरल्याने तो खाली पडला. डोक्याला जबर मार लागल्याने त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Police chasing theft fell in the well in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.