पोलीस आयुक्त म्हणतात, गुन्हेगारी नियंत्रणात

By admin | Published: October 30, 2015 03:03 AM2015-10-30T03:03:38+5:302015-10-30T03:03:38+5:30

उपराजधानी झपाट्याने वाढत असताना आम्ही शहरातील गुन्हेगारी कमी करण्यात यश मिळवले, असा दावा पोलीस आयुक्त ...

Police Commissioner says, under criminal control | पोलीस आयुक्त म्हणतात, गुन्हेगारी नियंत्रणात

पोलीस आयुक्त म्हणतात, गुन्हेगारी नियंत्रणात

Next

नागपूर : उपराजधानी झपाट्याने वाढत असताना आम्ही शहरातील गुन्हेगारी कमी करण्यात यश मिळवले, असा दावा पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी आज पत्रकारांशी चर्चा करताना केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खुनाचे प्रमाण ५० टक्के आहे, चेनस्रॅचिंगच्या ६९ घटना गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहेत, असाही दावा आयुक्तांनी केला. आता महिला अत्याचाराशी संबंधित गुन्हे रोखण्यावर आम्ही भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शहर पोलीस दलाच्या मासिक बैठकीत गुन्हेगारी अहवाल घेतल्यानंतर पोलीस आयुक्त आणि पत्रकारांशी विस्तृत चर्चा केली. ते म्हणाले, आहे तेवढ्या मनुष्यबळात अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत. गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांच्या सहकार्यांची नितांत गरज आहे. नागपुरातील नागरिक आणि प्रसारमाध्यमांची सुदैवाने पोलिसांना चांगली साथ लाभत आहे, त्याचमुळे येथील गुन्हेगारी नियंत्रित करण्यात आम्हाला यश मिळत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. जोपर्यंत नागरिक तक्रारी करणार नाही, तोपर्यंत गुन्हेगारांच्या कारवायांची माहिती कळणार नाही, त्याच्या मुसक्या आवळण्यासाठीही आम्ही धावपळ करू शकणार नसल्याचे त्यांनी अनेक उदाहरणे देत सांगितले. नागरिकांच्या प्रत्येक तक्रारीची दखल घेण्याचे आणि तक्रारकर्त्याचे समाधान करण्याचे आदेश प्रत्येक पोलीस ठाण्याला देण्यात आले आहे. त्यामुळे ठाण्यात तक्रार द्यायला आले आणि त्यांना परत पाठविले, असे प्रकार आता घडणार नाहीत. तसे कुठे झाले तर त्या ठाण्यातील संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही पोलीस आयुक्त म्हणाले. खुनाची संख्या अर्ध्यावर आल्याचे सांगताना हाआकडामात्र उपलब्ध झाला नाही. यावेळी सहपोलीस आयुक्त राजवर्धन सिन्हा, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे, उपायुक्त अभिनाशकुमार, भारत तांगडे, शैलेश बलकवडे, रंजन शर्मा, दीपाली मासिरकर आणि संजय लाटकर उपस्थित होते.
बलात्कार, विनयभंग आणि महिला अत्याचाराशी संबंधित गुन्हे रोखण्यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करीत आहेत, असे सांगून यंदाच्या गुन्ह्यांचे विश्लेषण करताना त्यांनी पत्रकारांना आकडेवारीही दिली.

अपहरण, पळवून नेणे
फूस लावून पळवून नेणे किंवा अपहरण करण्याचे २५९ गुन्हे या ९ महिन्यात घडले. त्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार २०२ गुन्हे दाखल करण्यात आले. १९० गुन्ह्यांचा पोलिसांनी छडा लावला. पळवून नेलेल्या १७७ मुलींपैकी ११९ मुली, तर, ८७ मुलांपैकी ६२ मुले परत मिळाली. त्यातील ९८ जणांना पोलिसांनी शोधून काढले. ६० स्वत:च परत आले. १६ पालकांनी तर ३ जणांना स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी शोधले. यापुढे महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी पोलीस काय करणार त्या उपाययोजनांचीही माहिती उपायुक्त दीपाली मासिरकर यांनी दिली.

नऊ महिन्यात १३० बलात्कार
उपराजधानीत यंदा जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात बलात्काराचे १३० गुन्हे घडले. त्यातील १२९ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. ४६ महिला-मुलींनी लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या तक्रारी नोंदविल्या आहेत. धाक दाखवून १० बलात्कार घडले. तर, प्रेमसंबंधातून ९ बलात्काराच्या घटना घडल्या. नोकरीचे आमिष दाखवून ९ जणींवर बलात्कार झाले. तर, लग्न करणार आहोत, अशी समज झाल्यामुळे २२ जणींनी शरीरसंबंध प्रस्थापित केले. नंतर मात्र लग्नास नकार दिल्याने त्यांनी तक्रार नोंदवली. उपराजधानीत या कालावधीत सामूहिक बलात्काराच्या पाच घटना घडल्या. तर, नवीन सुधारणा कायदा २०१३ अन्वये लैंगिक शोषण अथवा तसा प्रयत्न केल्याच्या २९ घटना घडल्या.यावर्षी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक (देहविक्रय) १०५ कारवाया पोलिसांनी केल्या. १६७ आरोपींना अटक करण्यात आली. ५४ पीडित मुलींची पोलिसांनी सुटका केली आणि १८ कुंटणखान्यातील ३४ खोल्या सील करण्यात आल्या.

Web Title: Police Commissioner says, under criminal control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.