पोलिसांची साथ, गुन्हेगार मोकाट

By admin | Published: May 30, 2017 10:15 PM2017-05-30T22:15:56+5:302017-05-30T22:15:56+5:30

शहरातील गुन्हेगारीची घाण साफ करून गुंडांवर अंकुश लावण्याची भाषा वरिष्ठ पोलीस अधिकारी वापरत असले तरी कनिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी

With the police, the criminals wreak havoc | पोलिसांची साथ, गुन्हेगार मोकाट

पोलिसांची साथ, गुन्हेगार मोकाट

Next
>ऑनलाइन लोकमत
 
नागपूर, दि. 30 -  शहरातील गुन्हेगारीची घाण साफ करून गुंडांवर अंकुश लावण्याची भाषा वरिष्ठ पोलीस अधिकारी वापरत असले तरी कनिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वरिष्ठांना दाद देत नाहीत. ते वरिष्ठांच्या आदेशांना न जुमानता कुख्यात गुंडांची साथ देतात. वाडी पोलीस कुख्यात जर्मन जापान गुंडांच्या टोळीविरुद्ध दाखल झालेल्या प्रकरणातून त्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. गुन्हा दाखल होऊन दहा दिवस झाले तरी वाडी पोलिसांनी कुख्यात जर्मन जपान टोळीच्या गुंडांविरुद्ध कारवाई केली नाही.
वाडी पोलीस ठाणे अनेक वादग्रस्त प्रकरणामुळे नेहमीच चर्चेत असते. ठाण्याच्या आजुबाजुला अवैध धंद्यांची रेलचेल आहे. पोलिसांनी आजुबाजुला मटका अड्डेवाले, बुकी, अवैध दारू विक्री करणारांना मूक परवाने दिले आहेत. पोलिसांशी साटेलोटे असल्यामुळे औद्योगिक कंपन्या आणि मोठमोठ्या गोदामात नेहमीच चो-या होत असतात. या भागात ट्रक चालकांना शस्त्राच्या धाकावर मारहाण करून लुटण्याचे गुन्हेही नेहमीच घडतात. वाडी पोलीस तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची औपचारिकता पार पाडते. त्यानंतर प्रकरण थंडबस्त्यात पडते. कुख्यात जर्मन जापान टोळीविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याचेही असेच झाले आहे. 
१९ मेच्या दुपारी १.३० वाजता ते अमरावती रोड, दत्तवाडीतील श्रीराम आॅटो ब्रदर्स गॅरेज येथे संतोषसिंग काश्मीरसिंग गादरी (वय ३४, रा. नारी) हे ट्रकमालक बसून होते. तेथे कुख्यात जर्मन जपान टोळीचे गुंड कल्लू इमरान खान (वय ३५), सोनू शर्मा (वय २८) आणि त्याचे सशस्त्र साथीदार स्वीफ्ट डिझायर कार (एमएच ३१/ सीआर २८६२) ने  आले. त्यांनी आम्हाला एक लाख रुपये खंडणी दे, अन्यथा तुझा आयशर ट्रक सिझिंग करून आम्ही घेऊन जाऊ’ अशी भीती त्यांनी दाखविली. एवढेच नव्हे तर गादरी यांच्याकडून जबरदस्तीने घटनास्थळी पाच हजार रुपये घेतले. त्यानंतर त्यांना एका एटीएम सेंटरमध्ये नेऊन तेथून पाच हजार रुपये काढण्यास भाग पाडले. 
 हे दहा हजार रुपये हिसकावून घेतल्यानंतर आरोपींनी गादरी यांना धाक दाखवून जबरदस्तीने आपल्या कारमध्ये बसवून कळमन्यातील महालगाव (कापसी) येथे नेले. तेथून गादरी यांचा आयशर ट्रक  घेऊन गेले. जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे गादरी गप्प बसले. याच दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जर्मन जपान टोळीच्या विरोधात गुन्हा दाखल करून शमसुन्निसा नामक निराधार महिलेला तिची जमीन परत करण्यास मदत केली. हे वृत्त कळल्यामुळे गादरी यांनी २२ मे रोजी गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांनी गादरी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दिली. तिची शहानिशा केल्यानंतर एसीपी वाघचौरे यांनी वाडी पोलीस ठाण्यात यासंबंधाने गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या. 
 
पोलिसांचा निर्ढावलेपणा, वरिष्ठांची हतबलता 
 वाडी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून जर्मन जपान टोळीच्या मुसक्या बांधण्याऐवजी या टोळीला मदत केली. गादरी यांच्या फोनवरून वाडी पोलिसांनी आरोपींना फोन करून तुमच्याविरुद्ध अशी तक्रार आल्याची माहिती जर्मन जपान टोळीच्या गुंडाला दिली. याच पोलिसांनी झाले गेले विसरून समेट करून आपला ट्रक घेऊन जा, असा सल्लाही गादरी यांना दिला.  तक्रार नोंदवण्यासाठी  तब्बल पाच टाळाटाळ केली. काही पत्रकारांनी या प्रकरणाची माहिती विचारल्याने वाडी पोलिसांनी जर्मन जपान टोळीच्या कल्लू खान आणि सोनू शर्माविरुद्ध कलम ३८४,३४ भादंविअन्वये गुन्हा नोंदविला. आता या प्रकरणाला १० दिवस झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक केलेली नाही. हिसकावून नेलेल्या ट्रकचे काय झाले, ते कळायला मार्ग नाही. दुसरीकडे फिर्यादींनी गुंडांकडून धमक्या मिळत आहे. त्यामुळे गादरी दहशतीत आले आहे. ववाडी पोलिसांकडून कुख्यात जर्मन जापान टोळीच्या गुंडांची अशी पाठराखण केली जात असताना वरिष्ठ पोलीस अधिकारी हतबल झाल्यासारखे बसले आहेत.  

Web Title: With the police, the criminals wreak havoc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.