पोलिसांकडून नक्षलवाद्यांचा शस्त्र कारखाना उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:09 AM2021-03-06T04:09:01+5:302021-03-06T04:09:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली, नागपूर : महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या मुरुमभूशी जंगलात पोलिसांनी धाडसी कारवाई करीत नक्षल्यांचा शस्त्राचा कारखाना उद्ध्व‌स्त ...

Police destroy Naxal arms factory | पोलिसांकडून नक्षलवाद्यांचा शस्त्र कारखाना उद्ध्वस्त

पोलिसांकडून नक्षलवाद्यांचा शस्त्र कारखाना उद्ध्वस्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

गडचिरोली, नागपूर : महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या मुरुमभूशी जंगलात पोलिसांनी धाडसी कारवाई करीत नक्षल्यांचा शस्त्राचा कारखाना उद्ध्व‌स्त केला. गुरुवार आणि शुक्रवार असे सलग दोन दिवस सी-६० चे जवान तसेच नक्षलवाद्यात जोरदार चकमक झाली. यात एका जवानाच्या पायाला गोळी लागल्याने तो जबर जखमी झाला. तर, पोलिसांसमोर टिकाव लागणार नसल्याचे लक्षात आल्याने नक्षलवादी जंगलात पळून गेले.

भामरागड तालुक्यातील मुरुमभुशी जंगल परिसरात पोलीस पथक (सी-६० जवान) गुरुवारी गस्त करीत होते. त्यांना या भागात नक्षल्यांचा तळ असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी तिकडे मोर्चा वळवला. पोलीस आल्याची कुणकुण लागताच नक्षल्यांनी त्यांच्या दिशेने बेछूट गोळीबार केला. मात्र, पोलिसांनी तेवढ्याच आक्रमकपणे नक्षल्यांचा मुकाबला केला. पोलिसांचा दबाव वाढल्यामुळे नक्षलवादी तेथून पळून गेले. नक्षल्यांच्या तळावर पोलिसांना शस्त्र तयार करण्याच्या मशीन आढळून आल्या. त्या सर्व मशीन पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या.

दरम्यान, ज्या भागात ही चकमक झाली तो भाग अबुझमाड म्हणून ओळखला जातो. तो नक्षल्यांचा गड समजला जातो. तिकडे मोठ्या प्रमाणात नक्षली असल्याचा अंदाज बांधून अतिरिक्त कुमक मागवून घेतली. शुक्रवारी दुपारी घटनास्थळावरून पोलीस पथके परत येत असताना नक्षलवाद्यांनी पुन्हा पोलिसांवर गाेळीबार केला. यावेळी झालेल्या चकमकीदरम्यान एका जवानाच्या पायाला गाेळी लागली. त्यामुळे तो जबर जखमी झाला. त्याला शुक्रवारी रात्री हेलिकॉप्टरने नागपुरातील एका खासगी इस्पितळात आणण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती गडचिरोली-गोंदिया परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी लोकमतला दिली.

----

गृहमंत्र्यांकडून काैतुक

नक्षल्यांचा कारखाना उद्ध्व‌स्त करणाऱ्या पोलीस पथकाचे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक संदीप गोयल आणि परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक संदीप पाटील यांनी अभिनंदन करून ही माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांना कळविली. गृहमंत्र्यांनीही गडचिरोली पोलिसांचे या कारवाईबद्दल काैतुक केले.

----

Web Title: Police destroy Naxal arms factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.