डब्बा व्यापाऱ्यांवर पोलिसांच्या धाडी
By admin | Published: May 13, 2016 03:01 AM2016-05-13T03:01:02+5:302016-05-13T03:01:02+5:30
रोखे खरेदी-विक्रीच्या आडून कोट्यवधींची सट्टेबाजी करणाऱ्यांवर (डब्बा व्यापारी) गुन्हेशाखेच्या पथकाने गुरुवारी एकाच वेळी धाडी घातल्या.
महत्त्वपूर्ण दस्तावेज जप्त : गुन्हेशाखेची कारवाई
नागपूर : रोखे खरेदी-विक्रीच्या आडून कोट्यवधींची सट्टेबाजी करणाऱ्यांवर (डब्बा व्यापारी) गुन्हेशाखेच्या पथकाने गुरुवारी एकाच वेळी धाडी घातल्या. उपराजधानीतील एकूण ११ ठिकाणी सकाळी सुरू झालेली धाडीची कारवाई रात्री ८ पर्यंत सुरूच होती. या कारवाईमुळे हजारो कोटींची बिनबोभाट सट्टेबाजी करणाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
सरकारी यंत्रणांच्या डोळ्यात धूळफेक करून उपराजधानीसह ठिकठिकाणचे डब्बा व्यापारी बनावट सॉफ्टवेअरचा वापार करून रोखे खरेदी विक्रीच्या नावाखाली कोट्यवधींची सट्टेबाजी करतात. अनेक वर्षांपासून देशातील विविध भागात ही सट्टेबाजी बिनबोभाट सुरू आहे. क्रिकेट बुकी आणि हवाला व्यावसायिकांप्रमाणेच नागपूर हे डब्बा व्यापाऱ्यांचे महत्त्वाचे सेंटर आहे. येथे १०० पेक्षा जास्त डब्बा व्यापारी, दलाल आणि लगवाडी करणारे आहेत. कोट्यवधींची ही उलाढाल विश्वासावर चालते. देण्याघेण्याचा आर्थिक व्यवहार हवालाच्या माध्यमातून केला जातो. अंबाझरीतील एका उद्योजक घराण्यातील महिला रामदासपेठेतील दलालाच्या माध्यमातून करोडोंचा डाव खेळत होती. या दलालाचे तिच्यावर आठ कोटी रुपये थकीत झाले. त्यातून त्यांच्यात मोठे भांडण झाले. प्रारंभी डब्बा व्यापारी आणि दलालांनी हे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. नंतर एका नेत्यानेही महिलेला थकीत रक्कम देऊन वाद संपुष्टात आणण्याची सूचना केली. मात्र, महिला आणि तिच्या पतीने ही रोकड परत करण्याचे टाळले. उलट त्या दलालावरच अंबाझरी ठाण्यात गुन्हा दाखल करवून घेतला. त्यानंतर या प्रकरणाचा बोभाटा झाला. या दोघांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर कुशल लढ्ढाने गुन्हेशाखेत एक तक्रार अर्ज देऊन वीणा सारडा या महिलेच्या चौकशीची मागणी केली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ‘डब्ब्यावर’ नजर रोखली. तब्बल चार महिने कसून तपास केल्यानंतर डब्बा व्यापाऱ्यांच्या हजारो कोटींच्या उलाढालीचे गणित पोलिसांच्या लक्षात आले. पक्की माहिती कळाल्यानंतर पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव, सहआयुक्त राजवर्धन सिन्हा, अतिरिक्त आययुक्त रंजनकुमार शर्मा आणि उपायुक्त दीपाली मासिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेच्या १० पथकानी गुरुवारी सकाळी एकाच वेळी रामदासपेठ, शंकरनगर, शिवाजीनगर, गांधीबागसह एकूण ११ ठिकाणी धाडी घातल्या.
तेथे झडती घेतल्यानंतर पोलिसांना कुशल किशोर लद्दड (एस.के. इन्व्हेस्टमेंट, रामदासपेठ), प्रीतेश लखोटिया (अथर्व सिक्युरिटीज, गांधीबाग), दिनेश सारडा (हॉटेल अनिलजवळ), रवी अग्रवाल ( एल सेव्हन ग्रुप टेलिफोन एक्स्चेंज चौक), गोपी मालू (जे.के. इन्व्हेस्टमेंट, डॉ. आंबेडकर चौक), अभिषेक बजाज (हनी अपार्टमेंट, डॉ. आंबेडकर चौक), सचिन अग्रवाल (नागपूर नागरिक बँकेच्या मागे, डॉ. आंबेडकर चौक), कन्नी थावरानी (टीव्हीएस शोरूमच्या बाजूला, डॉ. आंबेडकर चौक), दिनेश गोखलानी आणि वीणा घनश्यामदास सारडा (रा. सारडा हाऊस, शिवाजीनगर) ही मंडळी गैरकायदेशीर रोखे खरेदी-विक्रीचे व्यवहार करीत असल्याचे आढळले. यासाठी ते बनावट सॉफ्टवेअरचा वापर करीत असल्याचेही स्पष्ट झाले. त्यांच्याकडून पोलिसांनी ४ लाख २५ हजारांची रोकड, कच्ची नोंद असलेले रजिस्टर, कॉम्प्युटर, लॅपटॉप तसेच अन्य चीजवस्तू जप्त करण्यात आल्या.
तिच्यावर आठ कोटी रुपये थकीत झाले. त्यातून त्यांच्यात मोठे भांडण झाले. प्रारंभी डब्बा व्यापारी आणि दलालांनी हे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. नंतर एका नेत्यानेही महिलेला थकीत रक्कम देऊन वाद संपुष्टात आणण्याची सूचना केली. मात्र, महिला आणि तिच्या पतीने ही रोकड परत करण्याचे टाळले. उलट त्या दलालावरच अंबाझरी ठाण्यात गुन्हा दाखल करवून घेतला. त्यानंतर या प्रकरणाचा बोभाटा झाला. या दोघांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर कुशल लढ्ढाने गुन्हेशाखेत एक तक्रार अर्ज देऊन वीणा सारडा या महिलेच्या चौकशीची मागणी केली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ‘डब्ब्यावर’ नजर रोखली. तब्बल चार महिने कसून तपास केल्यानंतर डब्बा व्यापाऱ्यांच्या हजारो कोटींच्या उलाढालीचे गणित पोलिसांच्या लक्षात आले. पक्की माहिती कळाल्यानंतर पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव, सहआयुक्त राजवर्धन सिन्हा, अतिरिक्त आययुक्त रंजनकुमार शर्मा आणि उपायुक्त दीपाली मासिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेच्या १० पथकानी गुरुवारी सकाळी एकाच वेळी रामदासपेठ, शंकरनगर, शिवाजीनगर, गांधीबागसह एकूण ११ ठिकाणी धाडी घातल्या.