नागपुरातील वर्धमाननगरात पोलीसांचा ‘फ्लॅग मार्च’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 08:45 PM2020-04-09T20:45:08+5:302020-04-09T20:45:36+5:30
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावात सर्वत्र लॉकडाऊन असल्याने नागरिकांचे मनोबल उंचावण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी लकडगंज पोलीसांनी वर्धमाननगरात ‘फ्लॅग मार्च’ करत सोशल डिस्टेन्सिंगबाबत जनजागृती केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावात सर्वत्र लॉकडाऊन असल्याने नागरिकांचे मनोबल उंचावण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी लकडगंज पोलीसांनी वर्धमाननगरात ‘फ्लॅग मार्च’ करत सोशल डिस्टेन्सिंगबाबत जनजागृती केली.
यावेळी नागरिकांना घाबरू नका, घरी राहा आणि देशहितास प्राधान्य देण्याचे आवाहन पोलीसांनी केले. पोलीस निरिक्षक हिवरे यांच्या नेतृत्त्वात हा फ्लॅग मार्च काढण्यात आला. परिसरात फ्लॅग मार्च पोहचताच नागरिकांनी पोलीसांवर पुष्पवर्षाववर केला आणि टाळी वाजवून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व दिव्यांग व्यक्तींनी व्हील चेअरवर बाहेर येऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पोलीसांचा हा रुट मार्च श्रेयांस गार्डन येथून सुरू झाला. यावेळी दिलीप सारडा, गिरीश सुराना, राधेश्याम सारडा, संजय पुगलिया, राजू आया, दिलीप ठक्कर, महेंद्र कटारिया, जिन्नू बदानी, जगदीश अग्रवाल, तायल, कमल तपडीया, लष्करे, राहुल जव्हेरी, मनियार, सुंदर अग्रवाल, अभय संघवी, रामू अग्रवाल, जोशी, जयंत बुंदेला, बिरदीचं चोरडिया, संजय अग्रवाल, दिलीप रांका, उज्वल पगरिया, विजय झंवर, गोयल, अतुल कोटेचा, पवन पोद्दार, विकास जैन, भावेश करिया, गिरीश सुराणा, गुड्डू बूदला, रोशन तायल, शंकरलाल केडिया, संजय सुरजन, विपिन शाह, राहुल जवेरी, गिरीश अग्रवाल, रिंटू अग्रवाल, संजय पुगलिया, निशांत अग्रवाल यांनी आपापल्या निवासस्थानाहून पोलीसांचे स्वागत केले.
अराजक तत्त्वांचा धुडगूस
शहरात लॉकडाऊन असतानाही या भागात काही अराजक तत्त्व बुधवारी रात्री शिरले होते. त्यांच्याकडे शस्त्रही होते. यावेळी येथील चौकीदारांनी त्यांचा प्रतिकार करत एकास पकडले आणि अन्य दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. लॉकडाऊनचा फायदा घेत असे अराजक तत्त्व संधी साधत असल्याचा आरोप यावेळी येथील नागरिकांनी केला.