गुप्तधनाचे आमिष नंतर पोलिसांचा धाक

By admin | Published: January 7, 2015 12:56 AM2015-01-07T00:56:22+5:302015-01-07T00:56:22+5:30

आधी गुप्तधनाचे आमिष आणि नंतर पोलिसांच्या कारवाईचा धाक दाखवून एका दाम्पत्याने वृद्ध महिलेचे ४ लाख रुपये तसेच दोन भूखंड हडपले. शिल्पा (वय २५) आणि तिचा पती पंकज कांबळे

Police foiled after the confession | गुप्तधनाचे आमिष नंतर पोलिसांचा धाक

गुप्तधनाचे आमिष नंतर पोलिसांचा धाक

Next

वृद्धेची फसवणूक : दाम्पत्यावर गुन्हा दाखल
नागपूर : आधी गुप्तधनाचे आमिष आणि नंतर पोलिसांच्या कारवाईचा धाक दाखवून एका दाम्पत्याने वृद्ध महिलेचे ४ लाख रुपये तसेच दोन भूखंड हडपले. शिल्पा (वय २५) आणि तिचा पती पंकज कांबळे (वय २९, रा. माँ भगवतीनगर, न्यू अमरनगर) असे आरोपी दाम्पत्याचे नाव आहे.
कुसुमताई लीलाधर लाडेकर (वय ६४) असे पीडित वृध्देचे नाव आहे. तिच्यासोबत आरोपी शिल्पा आणि पंकजची ओळख आहे. तिच्याकडे चांगली संपत्ती असल्याची माहिती असल्यामुळे आरोपी कांबळे दाम्पत्याने तिला गंडविण्याचा कट रचला. मे २०१४ मध्ये या दोघांनी कुसुमताई यांना गुप्तधनाची माहिती मिळाल्याचे सांगितले. ते काढण्यासाठी मांत्रिक आणि पूजेसाठी काही रक्कम खर्च करावी लागेल. गुप्तधनातून लाखो रुपये मिळतील, असेही सांगितले. आमिषाला बळी पडून कुसुमताई यांनी शिल्पा आणि पंकजला काही रक्कम दिली. त्यानंतर काही दिवसांनी गुप्तधन काढत असताना पोलिसांची धाड पडली. आपले लोक पकडले गेले आता तुमचेही नाव त्यात आल्यामुळे पोलीस तुमच्यावर कारवाई करतील, असा धाक आरोपींनी वृद्ध कुसुमतार्इंना दाखविला. कारवाई टाळण्यासाठी ३ लाख, ९१ हजार रुपये तसेच दोन भूखंडांची विक्री करून घेतली. प्रत्येक वेळी धाक दाखवून आरोपी पैसे घेत असल्यामुळे कंटाळलेल्या कुसुमताई यांनी हुडकेश्वर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनीकांबळे दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला. पंकजला अटक करण्यात आली असून, शिल्पाची चौकशी सुरू आहे. (प्रतिनिधी)
विसंगत माहितीमुळे फुटले बिंग
कुसुमताई निवृत्त शिक्षिका असून, त्यांच्याकडे निवृत्ती वेतनासोबतच पती व मुलांच्या कमाईची मोठी रक्कम असल्याची आपल्याला खात्री होती. त्याचमुळे आपण त्यांना गंडविण्याचा कट रचला होता, अशी कबुलीवजा माहिती आरोपी पंकजने पोलिसांना दिल्याचे समजते. कधी पूजेसाठी, कधी कासव घेण्यासाठी, तर गुप्तधन काढण्यासाठी कधी पायाळू मुली आणण्यासाठी आरोपींनी कुसुमतार्इंकडून रक्कम मागितली होती. प्रत्येकवेळी त्या पैसे देत असल्याचे पाहून आरोपींना लोभ सुटला आणि त्यांनी चक्क भूखंडाची विक्री करूनच लाखो रुपये एकसाथ वसूल करण्याची योजना बनविली. मात्र, दोघेही वेळोवेळी विसंगत माहिती देत असल्यामुळे त्यांचा कुसुमतार्इंना संशय आला आणि त्या पोलिसांकडे पोहचल्यामुळे ही बनवाबनवी उघड झाली.

Web Title: Police foiled after the confession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.