नागपुरात डीजेसाठी पोलिसांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:11 AM2019-06-12T00:11:13+5:302019-06-12T00:11:59+5:30

डीजे बंद करायला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर काही लोकांनी हल्ला केला. सोमवारी रात्री जरीपटका परिसरात ही घटना घडली. जरीपटका पोलिसांनी या प्रकरणात १० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Police in Nagpur attacked for police | नागपुरात डीजेसाठी पोलिसांवर हल्ला

नागपुरात डीजेसाठी पोलिसांवर हल्ला

Next
ठळक मुद्देजरीपटक्यातील घटना : १० च्या विरोधात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डीजे बंद करायला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर काही लोकांनी हल्ला केला. सोमवारी रात्री जरीपटका परिसरात ही घटना घडली. जरीपटका पोलिसांनी या प्रकरणात १० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार नियंत्रण कक्षाला रात्री १२.३० वाजताच्या दरम्यान जरीपटका परिसरातील अ‍ॅक्सिस बँकेच्या इमारतीच्या छतावर डीजे वाजत असल्याची सूचना मिळाली. माहितीनुसार जरीपटकाचे कॉन्स्टेबल मनोज गाडगे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. मनोज यांना इमारतीच्या छतावर डीजे वाजताना आढळला. त्यांनी छतावर जाऊन डीजे बंद करण्यास सांगितले. येथे अंडरसहारे कुटुंबातील सदस्य जन्मदिनाची पार्टी करीत होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पार्टीमध्ये असलेले लोक दारूच्या नशेत होते. हे लोक कॉन्स्टेबल गाडगे यांच्याशी भांडण करू लागले. त्यांनी संयम बाळगण्यास सांगताच आरोपींना राग आला व संजय अंडरसहारे व सुनील अंडरसहारे व त्यांच्या भाच्यासहित आठ-दहा लोकांनी गाडगे यांच्यावर हल्ला केला. त्यांनी शिवीगाळ करीत गाडगे यांना मारहाणही केली व वर्दी उतरविण्याची धमकी दिली. गाडगे यांनी घटनेची माहिती अधिकाऱ्यांना दिली. अधिकारी घटनास्थळी पोहचले. मात्र आरोपींद्वारे अधिकाऱ्यांनाही धमकावण्यात आले. जरीपटका पोलिसांनी आरोपींच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण करणे व धमकाविणे व दंगा करण्याचा गुन्हा दाखल केला. प्रकरण दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी कुटुंबासह फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Police in Nagpur attacked for police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.