नागपुरात कोंबडबाजारावर पोलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 08:28 PM2020-04-10T20:28:19+5:302020-04-10T20:29:21+5:30
गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने नागपुरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नरसाळा भागात शुक्रवारी कोंबडबाजारात छापा घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने नागपुरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नरसाळा भागात शुक्रवारी कोंबडबाजारात छापा घातला. येथे कोंबड्याची झुंज लावून त्यावर जुगार खेळणाºया सात आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्याचप्रमाणे पोलिसांनी झुंजणारे आठ कोंबडेही ताब्यात घेतले. नरसाळा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून कोंबडबाजार भरविला जातो. येथे कत्तीच्या कोंबड्यांची झुंज लावली जाते व त्यावर हजारोंचा जुगार खेळला जातो, ही माहिती कळताच युनिट चारच्या पथकाचे प्रमुख अशोक मेश्राम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी तिथे छापा घालून कारवाई केली. यावेळी येथे कत्तीच्या कोंबड्यांची झुंज लावून त्यावर हजारोंचा जुगार खेळला जात असल्याचे आढळले. पोलिसांनी ७ जुगाºयांना ताब्यात घेतले. जुगाºयांसाठी झुंजणारे आठ कोंबडेही पोलिसांनी ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.