नागपुरात कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा : दोन वारांगनांसह दलाल ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 11:05 PM2020-06-09T23:05:30+5:302020-06-09T23:06:39+5:30

कोराडी नाक्याजवळ चालणाऱ्या एका कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा मारून दोन वारांगनाना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली.

Police raid Kuntankhana in Nagpur: Brokers arrested along with two prostitutes | नागपुरात कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा : दोन वारांगनांसह दलाल ताब्यात

नागपुरात कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा : दोन वारांगनांसह दलाल ताब्यात

googlenewsNext
ठळक मुद्देपरिमंडळ-५ च्या पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोराडी नाक्याजवळ चालणाऱ्या एका कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा मारून दोन वारांगनाना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. मंगळवारी सायंकाळी ६ च्या सुमारास परिमंडळ-५ चे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.
चंद्रशेखर सुब्रमण्यम मुदलियार (वय ४८) असे कुंटणखाना चालविणाऱ्याचे नाव असून, तो कोराडी नाका जवळच्या विजय को-आॅपरेटिव्ह सोसायटीत राहतो. मुदलियार यापूर्वी होस्टेल चालवायचा. लॉकडाऊनमुळे होस्टेल बंद पडल्याने उदरनिर्वाह करण्यासाठी त्याने वेश्याव्यवसाय करून देणाºया महिला-मुलींना स्वत:च्या घरची जागा उपलब्ध करून देणे सुरू केले. ही माहिती कळल्यानंतर पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी त्यांच्या विशेष पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, नायक विनोद सोनटक्के, चेतन जाधव, शिपाई अशोक दुबे, रवींद्र राऊत आणि योगेश ताथोड यांनी कोराडीचे ठाणेदार वजीर शेख यांना माहिती कळविली. शेख यांनी आपल्या सहकाऱ्यासह उपरोक्त पोलिसांना सोबत घेऊन सापळा रचला. मुदलियार याच्याशी संपर्क केला असता त्याने तीन हजार रुपयात वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन महिला उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी ६ च्या सुमारास पोलिसांकडून बोगस ग्राहक
मुदलियारकडे पाठविण्यात आले. त्याने त्यांच्याकडून तीन हजार रुपये घेऊन वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन जणी ग्राहकाला उपलब्ध करून दिल्या. काही वेळानंतर ग्राहकाने संकेत देताच पोलीस पथकाने मुदलियारच्या होस्टेलवर छापा मारला. त्या दोघींना ताब्यात घेतल्यानंतर आरोपी मुदलियार याच्याविरुद्ध पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

काम बंद झाल्यामुळे...!
वेश्याव्यवसाय करताना पकडण्यात आलेल्या दोघींपैकी एक गोंदिया तर दुसरी वर्धा मार्गावरची रहिवासी आहे. एक एका खासगी इस्पितळात रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला होती, तर दुसरी रेडिमेड कपड्यावर डिझाईन काढून देण्याचे काम करीत होती. लॉकडाऊनमुळे या दोघींनाही कामावरून कमी करण्यात आल्यामुळे त्यांनी वेश्याव्यवसाय सुरू केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

Web Title: Police raid Kuntankhana in Nagpur: Brokers arrested along with two prostitutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.