हुक्का पार्लरवर पोलिसांचे छापे

By admin | Published: June 24, 2016 03:08 AM2016-06-24T03:08:01+5:302016-06-24T03:08:01+5:30

गुन्हेशाखेच्या विशेष पथकाने आज रात्री उपराजधानीतील विविध भागात एकाच वेळी छापे मारून हुक्का पार्लरच्या संचालकांमध्ये खळबळ उडवून दिली.

Police raids on the Hukka parlor | हुक्का पार्लरवर पोलिसांचे छापे

हुक्का पार्लरवर पोलिसांचे छापे

Next

गुन्हेशाखा पथकाची कारवाई : पार्लर संचालकांमध्ये खळबळ
नागपूर : गुन्हेशाखेच्या विशेष पथकाने आज रात्री उपराजधानीतील विविध भागात एकाच वेळी छापे मारून हुक्का पार्लरच्या संचालकांमध्ये खळबळ उडवून दिली. रात्री १०.४५ वाजेपर्यंत शहरातील चार हुक्का पार्लरवरील कारवाई यशस्वी झाली होती तर, अनेक पार्लरमध्ये कारवाईची प्रक्रिया सुरू होती.
उपराजधानीत विविध भागात अगदी मोक्याच्या ठिकाणी बिनबोभाट हुक्का पार्लर सुरू आहेत. सायंकाळ सुरू होताच विविध हुक्का पार्लरमध्ये तरुण-तरुणींची गर्दी वाढते. काही पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी तोडपाणी करून मूक संमती देत असल्याने हुक्का पार्लरवाले कमालीचे निर्ढावले आहेत. नशेचे वेगवेगळे फ्लेवर देऊन तरुणाईला ते आकर्षित करतात. पोलिसांचा धाक नसल्याने पहाटेपर्यंत हे हुक्का पार्लर सुरू ठेवतात. तेथे मोट्या प्रमाणात गुन्हेगारही गर्दी करतात.
हे कळताच पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव, सहआयुक्त राजवर्धन सिन्हा आणि अतिरिक्त आयुक्त (गुन्हेशाखा) रंजनकुमार शर्मा यांनी कारवाईचे आदेश दिले.
त्यानुसार वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक रवींंद्र पाटील, अनिल कातकडे, सहायक निरीक्षक गोकुल सूर्यवंशी, प्रमोद सानप, सचिन लुले, अतुलकर, त्रिपाठी, हवलदार राजेश ठाकूर, राजकुमार देशमुख, लक्ष्मण शेंडे, दया बिसान्द्रे, बट्टूलाल पांडे, प्रकाश वानखेडे, राकेश यादव आदींनी एकाचवेळी ठिकठिकाणी धाडी घातल्या.यावेळी अनेक तरुण-तरुणी हुक्का लावताना पोलिसांना आढळले. रात्री १०.४५ वाजतापर्यंत पोलिसांनी फुटाळा चौपाटीवरील लेकसाईड ग्रील (आस्थापनाधारक धारक हर्षल किरण मेहता, मानकापूर), जीबीएस रेस्टॉरंट (वरुण सुनील सूद, अनंतनगर), वेफल हाऊस ( हिमांशू तीर्थराज भांदककर, अयोध्यानगर) आणि सियाज कॅफे (वीरेंद्र गोविंद डागोर), कर्बस्टोन लाऊंझ (यश खुशाल आसवानी, छापरूनगर), कोब्रा लाऊंझ (जाहीद शकील सय्यद) आदी हुक्का पार्लरवरील कारवाई पूर्ण केली. तसेच रविनगर चौक, भरतनगर, सदर आदी ठिकाणच्या काही पार्लरवर कारवाई सुरू होती.
पोलिसांची धाड पडताच हुक्क्याचा धूर उडवणाऱ्या तरुण-तरुणींची नशाच उतरली. अनेकांनी थेट बाहेर पळण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पोलिसांनी उपरोक्त ठिकाणाहून हुक्का तसेच त्यातील विविध तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. त्यात कोणते अमली पदार्थ आहेत, ते रासायनिक तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: Police raids on the Hukka parlor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.