मोठी बातमी! राज्यात १२, ५३८ जागांसाठी पोलीस भरती; गृहमंत्र्यांची घोषणा

By मोरेश्वर येरम | Published: January 11, 2021 02:46 PM2021-01-11T14:46:20+5:302021-01-11T14:48:10+5:30

पोलीस खात्यात १२,५३८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी सोमवारी दिली.

police recruitment for 12,538 posts in the state Anil Deshmukh big announcement | मोठी बातमी! राज्यात १२, ५३८ जागांसाठी पोलीस भरती; गृहमंत्र्यांची घोषणा

मोठी बातमी! राज्यात १२, ५३८ जागांसाठी पोलीस भरती; गृहमंत्र्यांची घोषणा

Next
ठळक मुद्देराज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची मोठी घोषणाराज्यात पहिल्या टप्प्यात ५,३०० जागांसाठी पोलीस भरतीपोलीस भरतीसाठी लवकरच जाहीरात निघणार

नागपूर
राज्यातील पोलीस भरतीबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठी घोषणा केली आहे. पोलीस खात्यात १२,५३८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी सोमवारी दिली. यात पहिल्या टप्प्यात ५,३०० जागांसाठी भरती होणार आहे. पुढे उर्वरित जागा दुसऱ्या टप्प्यात भरल्या जाणार आहेत. 

विशेष म्हणजे, १२,५३८ जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी भरती केली जाईल, असेही अनिल देशमुख म्हणाले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून 'एसईबीसी'च्या आरक्षणाशिवाय राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. पण या निर्णयाला मराठा संघटनांकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. त्यामुळे पोलीस भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात आहे. अनिल देशमुखांच्या आजच्या घोषणेनंतर पोलीस भरती प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याचं निश्चित झालं असलं तरी मराठा संघटना याबाबत कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 
 

Web Title: police recruitment for 12,538 posts in the state Anil Deshmukh big announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.