पोलीस म्हणाले, हॅप्पी बर्थडे टू यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 01:03 AM2020-04-25T01:03:38+5:302020-04-25T01:05:06+5:30
शुक्रवारी दिघोरी येथील योगेश्वर नगरात राहणाऱ्या जारोंडे आजोबा आणि नातवंडांचा एकत्र वाढदिवस पोलिसांनी साजरा केला आणि नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सारे जग कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये आहे. नागपुरातही गेल्या महिनाभरापासून संचारबंदी सुरू आहे. सगळे व्यवहार ठप्प पडले आहेत. आनंद सोहळेही साजरे करता येत नाहीे. अशा स्थितीत पोलीसही जीवावर उदार होऊन आपले कर्तव्य बजावत आहेत.
शुक्रवारी दिघोरी येथील योगेश्वर नगरात राहणाऱ्या जारोंडे आजोबा आणि नातवंडांचा एकत्र वाढदिवस पोलिसांनी साजरा केला आणि नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. अक्षय जारोंडे यांचे वडील दिलीप जारोंडे व त्यांची मुले जिनिशा आणि मयंक यांचे वाढदिवस २४ एप्रिलला येतात. नऊ वर्षीय जिनिशा हिला तिघांचाही वाढदिवस केक कापून साजरा करायचा होता. मात्र लॉकडाऊनमुळे बाहेरून केक आणणे शक्य नव्हते. तिने डीसीपी निर्मलादेवी यांना फोन केला आणि बाबांसोबत केक आणण्यासाठी बाहेर जाण्याची परवानगी मागितली. त्यावर निर्मलादेवी यांनी सोशल डिस्टन्सिंग जपण्याचे आवाहन केले. तसेच तुझा, तुझ्या भावाचा आणि आजोबांचा वाढदिवस आम्ही साजरा करू, अशाच शुभेच्छा दिल्या. लगेच निर्मलादेवी यांनी वाठोडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढेरे यांना फोन केला आणि जारोंडे यांच्याकडे केक नेण्याची सूचना दिली. त्यानुसार डेरे साहेब आणि टीम मेंबर्स जारोंडे यांच्याकडे पोहोचले. सगळ्यांनी मिळून केक कापला आणि आजोबा आणि नातवंडांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अशा तºहेने सामाजिक संवेदना जपण्याची वृत्ती पोलिसांनी शुक्रवारी दाखवली. जारोंडे कुटुंबीयांनीही पोलिसांच्या या संवेदनशीलतेला सलाम केला.