पोलीस ठाण्यात आता क्रिमिनल इंटेलिजेन्स युनिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 01:17 PM2020-06-23T13:17:06+5:302020-06-23T15:18:32+5:30
युनिटमध्ये २ अधिकारी आणि ६ कर्मचारी अशा ८ जणांचा समावेश असणार
नागपूर : प्रत्येक पोलीस ठाण्यात आता क्रिमिनल इंटेलिजेंस यूनिट निर्माण करण्यात आले आहे. नागपूरात गुन्हेगारी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या युनिटमध्ये २ अधिकारी आणि ६ कर्मचारी असे ८ जणांचा समावेश असेल. हे युनिट दोन पाळीत (दिवस रात्र) काम करेल.
पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवून ते काय करत आहेत, त्यांचे कुणाशी शत्रुत्व आहे. ते कुणावर किंवा त्यांचे शत्रू त्यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे का, याची माहिती संकलीत करण्याची जबाबदारी या युनिटवर राहील. त्या माहितीवरून पोलीस ठाण्यातील डीबी स्कॉड अधिक प्रभावीपणे गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी कामी येईल, असा हेतू या युनिट निर्माण करण्यामागे आहे.