उपराजधानीत सकाळी पोलिसांचा दंडुका, दुपारी सर्वत्र शांतता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 04:25 PM2020-03-24T16:25:42+5:302020-03-24T16:26:06+5:30
संसर्गजन्य असलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने २१ मार्च पासूनच नागपुरात ‘लॉकडाऊन’ केले आहे. तरीदेखील काही नागरिकांकडून उद्दामपणा दाखविला जात आहे .
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूच्या प्रकोपाला टोलवून लावण्यासाठी राज्यात ‘लॉकडाऊन’ सोबतच
कलम १४४ लागू झाली आहे. सरकारच्या दिशानिर्देशाकडे कानाडोळा करून बाहेर पडणाऱ्या
मस्तवाल नागरिकांना मंगळवारी पोलीसांच्या दंडूक्याचा सामना करावा लागला. दुपारपर्यंत हा
दंडूका इतका गाजला की दुपारपासून सर्वत्र शांतता नांदलेली दिसली.
संसर्गजन्य असलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने २१ मार्च
पासूनच नागपुरात ‘लॉकडाऊन’ केले आहे. तरीदेखील काही नागरिकांकडून उद्दामपणा
दाखविला जात आहे आणि व्यवस्थेची खिल्ली उडविण्याचा प्रकार सुरू असल्याने
नाईलाजाने राज्यसरकारला संपूर्ण राज्यात कलम १४४ सुरू करावी लागली. त्यामुळे संपूर्ण
पोलीस यंत्रणा सज्ज झाली. तरी देखील पूर्व नागपुरातील काही भागात सकाळी नागरिकांनी
बाहेर पडण्यास सुरुवात केली. प्रारंभी पोलीसांनी शांतपणाने त्यांना मागे वळण्यास सांगितले.
त्यावरही काही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसलेल्यांना पोलीसांना दंडूक्याचा उपयोग करावा
लागला. पोलीसांचा रोष बघून नंतर कोण्याही नागरिकाची घराबाहेर पडण्याची हिंमत झाली
नाही. अशाही परिस्थितीत खरबी चौक, दीघोरी चौक, मोठा ताजबाग, हसनबाग येथे भर
उन्हात आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीसांना काही नागरिकांनी आपली सेवा पुरविली. चामट
चौकात चहाची टपरी चालविणाऱ्या जैन कुटूंबाने पोलीसांना चहा, पाणी, नाश्ता पाठवून
सामाजिक कर्तव्यात सहभाग दिला. योगिता जैन यांनी आपली मुले यश व जान्हवी यांच्यासोब
त ही सेवा पुरवली तर वाठोडा येथील कार्यकर्ते बंटी रहांगडाले, अक्षय सुदामे, विशाल नागपूरे,
शाहीद शेख, नयन मेश्राम यांनी पूर्व नागपुरातील प्रत्येक पोलीस असलेल्या चौकात चहा, नाश्
ता व पाण्याची सेवा पुरवली. यावेळी भाजीविके्रत्यांना पोलीसांनी चौक सोडून आपले दुकान
लावण्याची परवानगी दिली. चौकात अकारण गर्दी होऊ नये, हा उद्देश यामागचा असल्याचे
पोलीसांनी स्पष्ट केले.