शासकीय वाहन धुताना शॉक लागून पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2022 09:59 PM2022-08-17T21:59:56+5:302022-08-17T22:26:03+5:30
Nagpur News शासकीय वाहन धुण्यासाठी वॉशिंग रँपवर गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचा मोटारपंपाचा शॉक लागल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
नागपूर : शासकीय वाहन धुण्यासाठी वॉशिंग रँपवर गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचा मोटारपंपाचा शॉक लागल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
साहेबराव खंडूजी बहाडे (५५, पोलीस वसाहत नागपूर ग्रामीण) हे ग्रामीण पोलीस मुख्यालयात मोटर परिवहन विभागात कार्यरत आहेत. बुधवारी सकाळी ७.३० वाजता ते शासकीय वाहन धुण्यासाठी वॉशिंग रँपवर गेले असता त्यांना मोटारपंपचा धक्का लागला आणि ते बेशुद्ध झाले. त्यांना उपचारासाठी मानकापूर येथील खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. साहेबराव बहाडे यांचे दोन महिन्यांपूर्वी उपनिरीक्षक पदावर प्रमोशन झाले होते. त्यांच्या अचानक निधनामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
.............