पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना सापडला
By admin | Published: July 28, 2016 02:30 AM2016-07-28T02:30:06+5:302016-07-28T02:30:06+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या एका सहायक उपनिरीक्षकास
नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या एका सहायक उपनिरीक्षकास (एएसआय) लाच घेताना अटक केली. प्रदीप नागरे (४०) रा. साहूनगर मानेवाडा असे आरोपीचे नाव आहे.
तक्रारकर्ता छायाचित्रकार आहे. तक्रारकर्ता २५ जुलै रोजी रात्री ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’मध्ये सापडला होता. त्याची दुचाकी गणेशपेठ पोलीस ठाण्यात ठेवली होती. नियमानुसार न्यायालयात दंड भरल्यानंतर आरोपीचे वाहन परत केले जाते. तक्रारकर्त्याने नागरे यांना वाहन सोडण्यास सांगितले. परंतु नागरे याने यासाठी एक हजार रुपये मागितले. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने एसीबी अधीक्षक संजय दराडे यांच्याकडे तक्रार केली. दराडे यांच्या निर्देशानुसार तक्रारीची खात्री पटविण्यात आली. लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने एसीबीने सापळा रचना. नागरेने तक्रारकर्त्याला रात्री १० वाजता ठाण्यात बोलावले. एसीबीने नागरे याला ठाण्यातच लाच घेतांना पकडले. एसीबीच्या कारवाईची माहिती होताच ठाणे हादरून गेले. (प्रतिनिधी)