शहीद पोलीस कुटुंबीयांना पाच एकर जमीन देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 07:52 AM2021-11-16T07:52:30+5:302021-11-16T07:53:02+5:30

गृहमंत्री; प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवणार

The police will give five acres of land to the families of the martyrs | शहीद पोलीस कुटुंबीयांना पाच एकर जमीन देणार

शहीद पोलीस कुटुंबीयांना पाच एकर जमीन देणार

Next
ठळक मुद्देचकमकीत जखमी चार पोलीस जवानांची त्यांनी नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. शौर्य गाजवणाऱ्या जवानांना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आणखी बक्षिसे व पुरस्कार दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

गडचिरोली/नागपूर : नक्षलविरोधी अभियानात लढताना शहीद झालेल्या पोलीस जवानांच्या कुटुंबीयांना शेतीसाठी पाच एकर जागा देण्यासह इतर मागण्यांचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात येईल, अशी ग्वाही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी येथे दिली. शनिवारच्या चकमकीत सहभागी पोलीस अधिकारी आणि सी-६० कमांडोंच्या सत्कारासाठी गृहमंत्री पाटील सोमवारी गडचिरोलीत आले होते. पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांनी शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. 

चकमकीत जखमी चार पोलीस जवानांची त्यांनी नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. शौर्य गाजवणाऱ्या जवानांना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आणखी बक्षिसे व पुरस्कार दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

पोलिसांना ५१ लाखांचे बक्षीस
पालकमंत्री शिंदे यांनी पोलिसांना ५१ लाखांचे रिवॉर्ड जाहीर केले. चकमकीत सहभागी जवानांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हे बक्षीस दिले जाणार आहे. शासनाच्या नियमानुसार जे काही रिवॉर्ड मिळतात ते मिळतीलच, पण पोलिसांचे मनोबल वाढावे यासाठी हे तत्काळ स्वरूपातील बक्षीस असल्याचे त्यांनी गडचिरोलीत सांगितले.
 

Web Title: The police will give five acres of land to the families of the martyrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.