बडतर्फ पोलीस पाटलाला पूर्वत पद बहाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:08 AM2021-09-11T04:08:33+5:302021-09-11T04:08:33+5:30
सावनेर : गावकऱ्यांच्या तक्रारीवरून उपविभागीय दंडाधिकारी अतुल मेहत्रे यांनी सावंगी येथील पोलीस पाटील अनिल बंसारी यांना बडतर्फ केले होते. ...
सावनेर : गावकऱ्यांच्या तक्रारीवरून उपविभागीय दंडाधिकारी अतुल मेहत्रे यांनी सावंगी येथील पोलीस पाटील अनिल बंसारी यांना बडतर्फ केले होते. यासंदर्भात दाखल करण्यात आलेले अपील विचारात घेत विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी बंसारी यांना पूर्ववत सेवेत रुजू करण्याचे आदेश दिले आहे.
अनिल बंसारी यांची सावंगी हेटी येथे पोलीस पाटील पदी ९ जून २०१७ रोजी नियुक्ती करण्यात आली होती. गावातील काही लोकांनी त्यांच्या विरोधात उपविभागीय अधिकारी अतुल मेहत्रे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. पोलीस पाटील व्यवस्थित कर्तव्य बजावत नसल्याचा आरोप या तक्रारीत होता. यावरून बंसारी यांना १५ जून २०२१ रोजी बडतर्फ करण्यात आले होते. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या या आदेशाला बंसारी यांनी विभागीय आयुक्ताकडे आवाहन दिले होते. तीत दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेत उपरोक्त निर्णय घेण्यात आला.