‘पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ विदर्भ’चे रविवारी लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 09:23 PM2019-08-30T21:23:20+5:302019-08-30T21:25:34+5:30

‘लोकमत’च्या पुढाकारातून तयार झालेल्या ‘पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ विदर्भ’ या ‘कॉफी टेबल बुक’चे रविवार १ सप्टेंबर रोजी लोकार्पण होणार आहे.

'Political Icon of Vidarbha' publish on Sunday | ‘पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ विदर्भ’चे रविवारी लोकार्पण

‘पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ विदर्भ’चे रविवारी लोकार्पण

Next
ठळक मुद्दे‘लोकमत’चा उपक्रम : राजकीय क्षेत्रातील मान्यवरांवरील ‘कॉफी टेबल बुक’

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘लोकमत’च्या पुढाकारातून तयार झालेल्या ‘पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ विदर्भ’ या ‘कॉफी टेबल बुक’चे रविवार १ सप्टेंबर रोजी लोकार्पण होणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ पार पडेल. राजकीय क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या विदर्भातील राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या कार्यावर या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला आहे.
रविवारी दुपारी ४ वाजता स्थानिक रामदासपेठ येथील सेंटर पॉईंट हॉटेलच्या ‘मिलेनियम’ सभागृहात हा लोकार्पण सोहळा पार पडेल. यावेळी ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा तसेच ‘लोकमत मीडिया प्रा.लि.’चे ‘एडिटर इन चीफ’ राजेंद्र दर्डा प्रामुख्याने उपस्थित राहतील.
टीका किंवा आरोपांची तमा न बाळगता लोककल्याणाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून कार्य करणारे राजकारणी आजही आहेत. ‘लोकमत’ने अशा राजकारण्यांचा नेहमीच गौरव केला आहे. आजवर अनेक वैदर्भीय नेत्यांनी देश तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने अमिट छाप पाडली आहे. त्यांचाच वारसा पुढे चालवत राजकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत असलेल्या अनुभवी व नव्या दमाच्या अनेक व्यक्ती आजही विदर्भात कार्यरत आहेत. अशा व्यक्तींच्या कार्याचा वेध या ‘कॉफी टेबल बुक’च्या माध्यमातून घेण्यात आला आहे. समाजजीवनात वावरणाऱ्या या व्यक्तींचे कार्य, त्यांची यशोगाथा समाजासमोर नेऊन त्यातून अनेकांना प्रेरणा मिळावी तसेच त्यातून देशाचे भविष्य घडविणारी नवी कर्तृत्ववान पिढी तयार व्हावी हा या ‘कॉफी टेबल बुक’ मागचा उद्देश आहे. विदर्भातील एकूण ५२ राजकीय नेत्यांच्या प्रवास यात साकारण्यात आला आहे.

Web Title: 'Political Icon of Vidarbha' publish on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.