राजकीय पक्षांत उच्चशिक्षितांचा ‘दुष्काळ’

By admin | Published: February 14, 2017 01:56 AM2017-02-14T01:56:48+5:302017-02-14T01:56:48+5:30

नागपूर मनपा निवडणुकांत सर्वच राजकीय पक्षांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का फारच थोडा असल्याचे चित्र आहे.

Political parties 'drought' of higher education | राजकीय पक्षांत उच्चशिक्षितांचा ‘दुष्काळ’

राजकीय पक्षांत उच्चशिक्षितांचा ‘दुष्काळ’

Next

६४ टक्के उमेदवार ‘अंडरग्रॅज्युएट’ ७ टक्के जणांकडेच पदव्युत्तर शिक्षण
केवळ ६ ‘पीएचडी’ उमेदवार रिंगणात
योगेश पांडे नागपूर
नागपूर मनपा निवडणुकांत सर्वच राजकीय पक्षांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का फारच थोडा असल्याचे चित्र आहे. शहरातील ३८ प्रभागांतून केवळ ८८ पदव्युत्तर उमेदवारांनाच निवडणुकांच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी उच्चशिक्षितांना डावलले असून ६४ टक्के उमेदवारांचे शिक्षण हे केवळ बारावीपर्यंतच झाले आहे. राजकारणातील उच्चशिक्षितांचा टक्का वाढावा, अशी अपेक्षा विविध पक्षांमधील नेते अनेकदा व्यक्त करताना दिसून येतात. मात्र प्रत्यक्ष निवडणुकांत कमी शिक्षण घेतलेल्यांनाच प्राधान्य देत शिक्षितांना राजकीय प्रवाहात आणण्यासंदर्भाच पक्ष उदासीन असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या शिक्षणाचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने उपलब्ध शपथपत्रांची पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे. शहरात एकूण १ हजार १३५ उमेदवार रिंगणात आहेत. केवळ ८८ उमेदवारांकडे पदव्युत्तर पदवी आहे. आकडेवारीच्या तुलनेत ही संख्या केवळ ७.७५ टक्के इतकीच आहे. ‘पीएचडी’ उमेदवारांची संख्या तर अवघी ६ इतकीच आहे. तर १८५ उमेदवार हे पदवीधर आहेत. केवळ २४.५ टक्के उमेदवारांचे शिक्षण पदवी किंवा त्याहून अधिक झाले आहे.

४९५ उमेदवारांनी ‘कॉलेज’च पाहिले नाही
निवडणुकांच्या रिंगणात असलेल्यांपैकी ४९५ उमेदवारांचे केवळ शालेय शिक्षणच झाले आहेत. दहावी किंवा त्याहून कमी शिक्षण झालेल्यांची टक्केवारी ४३.६१ टक्के इतकी आहे. यातील अर्ध्याहून अधिक उमेदवारांचे शिक्षण तर नववी किंवा त्याहून कमी झालेले आहे.
काँग्रेस-भाजपा ‘सेम टू सेम’
निवडणुकांच्या निकालानंतर जिंकणाऱ्या उमेदवारांची आकडेवारी आत्ताच सांगता येणार नाही. मात्र भाजपा व कॉंग्रेसने एका बाबतीत मात्र समान संख्या नक्कीच गाठली आहे. दहावीपर्यंत शिक्षण असलेल्या उमेदवारांची एकूण संख्या ४९५ इतकी आहे. यात भाजपा व कॉंग्रेसमधील प्रत्येकी ५३ उमेदवारांचा समावेश आहे. दहावीपर्यंत शिकलेल्या अपक्ष उमेदवारांची संख्या १६० इतकी आहे.

१६ उमेदवार अशिक्षित
विविध राजकीय पक्ष व अपक्ष असे मिळून १६ अशिक्षित उमेदवार निवडणुकांत उतरले आहेत. यात सहा अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. बसपा व राष्ट्रीय जनसुराज्य पक्षातर्फे दोन तर राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, मुस्लीम लीग, भारिप बहुजन महासंघ, एमआयएम, आरपीआय (सेक्युलर) या पक्षांतर्फे प्रत्येकी एक अशिक्षित उमेदवार उभा आहे.

‘पीएचडी’ झालेले उमेदवार : डॉ.परिणिता फुके, डॉ.विशाखा जोशी, डॉ.समिधा पांडे, डॉ.वैजयंती सेनाड, डॉ.हरीश मोहिते, डॉ.रेखा बारहाते

Web Title: Political parties 'drought' of higher education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.