राजकारण अतृप्त आत्म्यांचा महासागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 01:12 AM2017-09-17T01:12:23+5:302017-09-17T01:12:38+5:30
राजकारण हा अतृप्त आत्म्यांचा महासागर आहे. ज्यांना मिळाले तेच अतृप्त असतात. आणखी काही मिळावे, यासाठी प्रयत्न करीत असतात तर ज्यांना काहीच मिळाले नाही, ते मात्र खºया अर्थाने तृप्त असतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राजकारण हा अतृप्त आत्म्यांचा महासागर आहे. ज्यांना मिळाले तेच अतृप्त असतात. आणखी काही मिळावे, यासाठी प्रयत्न करीत असतात तर ज्यांना काहीच मिळाले नाही, ते मात्र खºया अर्थाने तृप्त असतात. समाजात चांगले काम करणाºयांचा सत्कार होत नाही आणि चुकीचे काम करणाºयांना शिक्षा मिळत नाही, हीच खºया अर्थाने समाजातील समस्या आहे, असे रोखठोक मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले.
विदर्भ गौरव प्रतिष्ठान व श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ पत्रकार मनीष अवस्थी आणि स्तंभलेखक व एबीपी न्यूज वाहिनीवरील राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांना शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या हस्ते स्वर्गीय अनिलकुमार स्मृती पुरस्कार-२०१६ प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी गडकरी बोलत होते. पंचशील चौक धंतोली येथील टिळक पत्रकार भवनाच्या सभागृहात आयोजित या समारंभाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी खासदार दत्ता मेघे होते. ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत विजय कुवळेकर हे प्रमुख अतिथी होते. गिरीश गांधी, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर व पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र व्यासपीठावर होते.
नितीन गडकरी म्हणाले, राजकारण म्हणजे केवळ सत्ता स्थापन करणे नव्हे. राजकारणाची ही व्याख्या बदलायला हवी. समाजकारण हेच राजकारण झाले पाहिजे. जी व्यक्ती आपला कामधंदा व घरदार व्यवस्थित सांभाळू शकत नाही, ती देशाची सेवाही करू शकत नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, दोन्ही सत्कारमूर्ती हे आपले चांगले मित्र आहेत. आपल्या माणसाचा सत्कार होत असल्याचा आनंद आहे. दिल्लीमध्ये विदर्भातील पत्रकार मंडळी आपल्या माणसांची काळजी घेतात. राजकारणावर आपली मते ताकदीने मांडतात, पण तितकीच काळजी सुद्धा घेत असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
विजय कुवळेकर यांनी प्रसार माध्यमांच्या विश्वासार्हतेवर आज प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे सांगून समाजात चे जांगले आहे, ते दिसू द्या असे आवाहन केले.
माझ्या जिवंतपणी विदर्भ राज्य करून द्या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांनी ‘केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुपात दिल्ली आणि मुंबई नागपुरात आहेत. त्यामुळे आता माझ्या जिवंतपणी तरी विदर्भ राज्य करून द्या’, असे भावनिक आवाहन केले.