Maharashtra Election 2019; मतदानाच्या महाकुंभास प्रारंभ; मोहन भागवत, नितीन गडकरी यांनी बजावला मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 08:23 AM2019-10-21T08:23:51+5:302019-10-21T08:25:21+5:30

महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरच्या १३ व्या विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी २१ आॅक्टोबर रोजी सकाळी सात वाजता मतदानाला प्रारंभ झाला. उ

The polling booth begins; Mohan Bhagwat voted for the right to vote | Maharashtra Election 2019; मतदानाच्या महाकुंभास प्रारंभ; मोहन भागवत, नितीन गडकरी यांनी बजावला मतदानाचा हक्क

Maharashtra Election 2019; मतदानाच्या महाकुंभास प्रारंभ; मोहन भागवत, नितीन गडकरी यांनी बजावला मतदानाचा हक्क

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरच्या १३ व्या विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी २१ आॅक्टोबर रोजी सकाळी सात वाजता मतदानाला प्रारंभ झाला. उपराजधानीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सकाळी सात वाजता भाऊजी दप्तरी शाळा, महाल येथे मतदान केले. केंद्रीय नेते नितीन गडकरी व त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनीही सकाळी ८ च्या सुमारास मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केले.
नागपूर शहरातील विविध मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांनी हजेरी लावणे सुरू केले होते. गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाच्या धास्तीमुळेही अनेक नागरिक सकाळीच मतदान आटोपून घेण्याच्या उद्देशाने बाहेर पडल्याचे दिसत होते.
मतदानाकरिता शहरात जागोजागी चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. मतदान केंद्राबाहेरही बंदोबस्त आढळून येत होता. मतदान केंद्रांवर नागरिकांनी सकाळपासूनच रांगा लावल्याचे दृश्य जागोजागी आढळून आले.

Web Title: The polling booth begins; Mohan Bhagwat voted for the right to vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.