गंगा जमुनात उभारली मतदानाची गुढी
By मंगेश व्यवहारे | Published: April 9, 2024 07:12 PM2024-04-09T19:12:13+5:302024-04-09T19:13:36+5:30
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांच्या हस्ते मतदानाची गुढी उभारून, त्यांच्याहस्ते पुजन केले.
नागपूर: रेड लाईट एरीया म्हणून प्रसिद्ध असलेल्या गंगाजमुनात १०० टक्के मतदान व्हावे, यासाठी गुढी पाडव्याच्या निमित्त मतदानाची गुढी उभारून १०० टक्के मतदानाचा संकल्प करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी व जि.प.च्या सीईओ सौम्या शर्मा यांच्या मार्गदर्शनात समाजकल्याण विभागाच्या सहा. आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
जिल्हाधिकाऱ्यांनी ‘मिशन डिस्टींक्शन’ अभियानाच्या माध्यमातून ७५ टक्के मतदान व्हावे यासाठी समाजातील विविध घटकांपर्यंत प्रशासनाने पोहचून मतदानासाठी जनजागृती करण्यासाठी आवाहन केले आहे. या उपक्रमांतर्गत समाजकल्याण विभागाच्या सहा. आयुक्त सुकेशिनी तेलगोटे व मनपाचे क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर यांनी गंगा जमुना या रेड लाईट एरीयांमध्ये कार्यक्रम घेतला.
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांच्या हस्ते मतदानाची गुढी उभारून, त्यांच्याहस्ते पुजन केले. त्यांना १०० टक्के मतदान करण्याची शपथ दिली व निष्पक्ष मतदान करण्याचा संकल्प करवून घेतला. यावेळी रेडक्रॉस सोसायटीचे आर. के. सिंग, हेमलता लोहवे, विद्या कांबळे, आंचल वर्मा, प्रकल्प अधिकारी गोडबोले, समतादूत मोईन खान आदी उपस्थित होते. यावेळी सुकेशिनी तेलगोटे यांनी मतदानाचा अधिकार आणि लोकशाहीच्या कर्तव्याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन खुशाल ढाक यांनी केले.