नाल्यातील दूषित पाणी शुद्ध करून विकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:12 AM2021-08-14T04:12:45+5:302021-08-14T04:12:45+5:30

नागपूर : भूजल पातळी कायम रहावी तसेच दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्याच्या उद्देशाने महापालिका नदी, नाल्याच्या काठावर असलेल्या १२ उद्यानांमध्ये ...

Polluted water from Nala will be purified and sold | नाल्यातील दूषित पाणी शुद्ध करून विकणार

नाल्यातील दूषित पाणी शुद्ध करून विकणार

Next

नागपूर : भूजल पातळी कायम रहावी तसेच दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्याच्या उद्देशाने महापालिका नदी, नाल्याच्या काठावर असलेल्या १२ उद्यानांमध्ये मलजल शुद्धीकरण केंद्र (एसटीपी) उभारणार आहे. या पाण्याचा वापर उद्यानांमध्ये तर केला जाईल. सोबतच नागरिकांसाठी बाहेरच्या वापरासाठी व बांधकामांसाठी फक्त ५०० रुपयांत ४ हजार लिटरचे टँकर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

महापौर दयाशंकर तिवारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शंकरनगर उद्यान, सेनापती उद्यान व म्हाडा कॉलनी उद्यानात एसटीपीचा शुभारंभ होईल. एसटीपी सोलरवर संचलित असेल. या प्रकल्पात जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. येथे शुद्ध होणारे पाणी बांधकामांना लाल रंगाच्या टँकरद्वारे पुरविले जाईल.

यासाठी आरटीओकडे परवानगी मागितली आहे. बिल्डरांची संस्था क्रेडाईनेदेखील यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. सद्य:स्थितीत महापालिका ३२० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करून वीज केंद्रांना विकत आहे. यापासून वर्षाकाठी ६२ कोटी रुपये मिळतात.

या उद्यानांमध्ये होईल एसटीपी

- शहरातील १२ उद्यानांमध्ये एसटीपी उभारण्यात येईल. यात कर्वेनगर बगीचा वर्धा रोड, शंकर नगर बगीचा, जय विघ्नहर्ता कॉलनी बगीचा, मोक्षधाम दहनघाट बगीचा, मोक्षधाम दहनघाट बगीचा, सेनापतीनगर बगीचा, दिघोरी दहनघाट, चिटणवीसपुरा बगीचा, तुळशीबाग बगीचा, रतन कॉलनी बगीचा, नाइक तलाव बगीचा, तुलसीनगर बगीचा, म्हाडा कॉलनी बगीचा, सखाराम पंत मेश्राम बगीचा मंगळवारी या उद्यानांचा समावेश आहे.

७५ चौकांमध्ये उत्सव

- स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष असल्यामुळे ७५ संघटनांनी शहरातील ७५ चौकांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते ८ वाजता दरम्यान कोविड नियमांचे पालन करून हे कार्यक्रम आयोजित केला जातील. याशिवाय वर्षभर विविध कार्यक्रम होतील.

Web Title: Polluted water from Nala will be purified and sold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.