पॉलिटेक्निकचे ऑनलाईन अर्ज भरण्याला पुन्हा मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:11 AM2021-08-22T04:11:16+5:302021-08-22T04:11:16+5:30
नागपूर : तांत्रिक शिक्षण संचालनालय (डीटीई) ने पॉलिटेक्निक अभ्यासक्रमात प्रवेशासाठी मुदतवाढ दिली आहे. आता २७ ऑगस्टपर्यंत विद्यार्थी अर्ज भरू ...
नागपूर : तांत्रिक शिक्षण संचालनालय (डीटीई) ने पॉलिटेक्निक अभ्यासक्रमात प्रवेशासाठी मुदतवाढ दिली आहे. आता २७ ऑगस्टपर्यंत विद्यार्थी अर्ज भरू शकणार आहे. यापूर्वी २० ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याती अंतिम तिथी होती.
डीटीईने यावेळी पॉलिटेक्निकच्या सर्व अभ्यासक्रमाच्या सर्वच जागा पूर्ण भरण्याचे लक्ष्य ठेवले आहे. परंतु अपेक्षेनुसार विद्यार्थ्यांचे अर्ज आलेले नाही. त्यामुळे सातत्याने मुदतवाढ दिली जात आहे. यापूर्वी अर्ज भरण्याची अंतिम तिथी २५ जुलै होती. ती वाढवून ३० जुलै करण्यात आली. दहावीचा निकाल लागल्यानंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. आतापर्यंत किमान ३ वेळा मुदत वाढविण्यात आली आहे.
डीटीईच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा या भूमिकेतून प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात येत आहे. अजूनही निश्चित नाही की २७ ऑगस्टनंतर प्रवेशाची पुढची प्रक्रिया होईल की नाही. नवीन प्रवेश प्रक्रियेच्या कार्यक्रमानुसार अंतिम मेरिट यादी ४ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होईल. पुन्हा जर मुदतवाढ दिल्यास विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बराच काळ वाट बघावी लागू शकते.