घोरपड-शिरपूर-धारगाव मार्गाची दयनीय अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:10 AM2021-02-11T04:10:01+5:302021-02-11T04:10:01+5:30

कामठी : कामठी तालुक्यातील घोरपड-शिरपूर-धारगाव मार्गावरील डांबर व गिट्टी उखडून पडल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. याच मार्गावर धारगाला ...

Poor condition of Ghorpad-Shirpur-Dhargaon road | घोरपड-शिरपूर-धारगाव मार्गाची दयनीय अवस्था

घोरपड-शिरपूर-धारगाव मार्गाची दयनीय अवस्था

googlenewsNext

कामठी : कामठी तालुक्यातील घोरपड-शिरपूर-धारगाव मार्गावरील डांबर व गिट्टी उखडून पडल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. याच मार्गावर धारगाला लागून निर्माणाधीन पुलाचे काम सुरू आहे. येथे दोन महिन्यांपासून दिशादर्शक नसल्यामुळे केव्हाही मोठा अपघात घडू शकतो. त्याकडे संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

घोरपड-शिरपूर-धारगाव मार्गाचे वर्षभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले. हे काम योग्यरित्या न झाल्यामुळे वर्षभरातच डांबर उखडून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्याचा फटका वाहन चालकांना बसतो आहे. धारगाव, शिरपूर, घोरपड येथील विद्यार्थ्यांना व नागरिकांना याच मार्गाने कामठी येथे जाणे-येणे करावे लागते. याच मार्गावरील धारगावला लागून पुलाचे बांधकाम चालू असून पुलाच्या दोन्ही बाजूला दिशादर्शक फलक न दाखवल्यामुळे अनेक वाहने खड्ड्यात पडून अपघात सुद्धा घडले आहेत. येथे मोठा अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कंत्राटदार व संबंधित अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. येथे दिशादर्शक फलक लावण्याची मागणी व घोरपड-शिरपूर-धारगाव मार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी शेषराव ढेंगरे, घन:श्याम शेंद्रे, श्रीराम हटवार, सचिन वानखेडे, विलास ढेगरे, सुनील शेंद्रे, दीपक भोयर व गावकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Poor condition of Ghorpad-Shirpur-Dhargaon road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.